Rahul Narvekar model code violation : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. नार्वेकर यांचे वर्तन आक्षेपार्ह व आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि त्यांच्या कार्यालयातील 70 अधिकारी व कर्मचारी नार्वेकर यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रीय भाग घेत असून या सर्वांवरही आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्र पाठवले
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्र पाठवले आहे. मुंबईतील कुलाबा मतदार संघातील प्रभाग क्रमांक 225, 226 व 227 मधून राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर, बहिण गौरवी शिवलकर व वहिनी हर्षदा नार्वेकर या तिघांनी भारतीय जनता पक्ष म्हणजेच BJP मधून उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. अर्ज दाखल करताना राहुल नार्वेकर हे स्वतः उपस्थित असल्याचे या पात्रात नमूद आहे.तर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असताना राहुल नार्वेकर यांनी पोलिसांच्या माध्यमातून भाजपा उमेदवारांच्या विरोधात अर्ज दाखल करणा-या विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावले आणि अर्ज भरण्यापासून रोखल्याची माहितीही पत्रात देण्यात आली. याशिवाय निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्यामुळे या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पाहिले असंही सपकाळ यांनी पत्रात लिहिले आहे.
विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करुन घेऊ नये
लोकशाहीमध्ये निवडणूका निष्पक्ष, पारदर्शक आणि निर्भिड वातावरणात पार पाडणे हे आपल्या आयोगाचे महत्वपूर्ण कर्तव्यच आहे. परंतु या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षांच्या उमेदवारांवर दबाव आणून अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारी मिळत असून विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करुन घेऊ नये यासाठी प्रशासनावर दबाव आणण्यात आला, विरोधी पक्षांच्या उमेदवारांना धमकावण्यात आले. हे अत्यंत गंभीर असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
हे ही वाचा : महापालिका निवडणूक मतदान प्रक्रिया आधीच शिंदे सेना-भाजपची विजयी घोडदौड सुरूच
राहुल नार्वेकर हे संवैधानिक पदावर
राहुल नार्वेकर हे संवैधानिक पदावर असून त्यांच्याकडून अशापद्धतीने दडपशाहीचा मार्ग अवलंबणे लोकशाहीचा खून करण्यासारखे आहे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची हर्षवर्धन सपकाळ यांनी मागणी केली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. नार्वेकर यांचे वर्तन आक्षेपार्ह व आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि त्यांच्या कार्यालयातील 70 अधिकारी व कर्मचारी नार्वेकर यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रीय भाग घेत असून या सर्वांवरही आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.