मुंबई – शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यापासून सुरु आहे. त्यांना शिवसेना ठाकरे गटाच्या दशहरा मेळाव्यात सहभागी होणार असल्याच्या चर्चच देखील सुरु होत्या. परंतु ते मेळाव्यात काही कारणास्तव सहभागी झाले नाही. परंतु बऱ्याचदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यां एकत्र बघितल्या गेले. त्यांच्या एकत्र येण्यावर आणि निवडणूक लढवण्याचा चर्चांवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची महाविकास आघाडीत येण्याची इच्छा असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटले आहे. त्यांनी या चर्चांना दुजोरा देत याबाबत दिल्लीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाशी चर्चा सुरू असल्याचेही स्पष्ट केले आहे. आता खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य किती खरे आणि खोटे हे पाहणे योग्य ठरेल. लवकरच राज्यात निवडणूका होणार असून या निवडणुकीत दोघेही एकत्र लागणार असल्याच्या चर्चेनंतर संजय राऊत यांनी केलेले वक्तव्याची यात आणखी भर पडली आहे.
हा प्रश्न फक्त निवडणुकांपुरता मर्यादित नसून\ ठाकरे स्वतः महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक आहेत. याबाबत आमची दिल्लीत चर्चा सुरू आहे. याबाबत पुढे ते म्हणाले, ईव्हीएम (EVM), निवडणूक आयोगातील गैरप्रकार आणि सरकारी यंत्रणांवरील दडपशाही यासारख्या मुद्द्यांवर एकत्रितपणे आवाज उठवणे महत्त्वाचे असल्याचेही वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
काँग्रेसचे नेतृत्व दिल्लीत आहे. राज्यातील काँग्रेसला स्वतःहून निर्णय घेण्याचे अधिकार नाही. याशिवाय आम्ही सर्वजण महाराष्ट्रात निर्णय घेऊ. म्हणजे, मनसेच्या समावेशाबाबत काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांचा निर्णय महत्त्वाचा असेल, महाविकास आघाडीत कोणताही नवीन घटक सामील करायचा असल्यास नक्कीच एकत्रित बसून चर्चा करावी लागेल असे खासदार संजय राऊत म्हणाले.
मनसे प्रमुख राज ठाकरे महाविकास आघाडीत येण्यास तयार असून त्यांची ही इच्छा आहे. खास करून काँग्रेसला देखील सोबत घेण्याची राज ठाकरेंची भूमिका आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. यावरून असे निदर्शनास येते कि, आगामी काळात महाराष्ट्राचे राजकारण एका नवीन वळणावर येण्याच्या मार्गावर आहे.