शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अचानक तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून खासदार संजय राऊत यांनी सकाळीच पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेनंतरच त्यांची तब्येत अचानक खराब झाली.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना मुंबईतील भांडुप येथील फोर्टीज हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलॆ आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी याच रुग्णालयात रक्त तपासणी केली होती. त्यांना आज तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आज सकाळी घेतली होती पत्रकार परिषद
आज सकाळच्या सुमारास संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या युती बाबत स्पष्टीकरण दिले. मनसे नेते राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत येण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बऱ्याच दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरु आहेत. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा चर्चा सुरु झाली होती.
2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडल्यापासून संजय राऊत सातत्याने प्रभावीपणे ठाकरे गटाची बाजू मांडत आहे. त्यांना आज अचानक रुग्णालयात दाखल करण्यामागे काय कारण आहे ? त्यांना नेमके काय झाले याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.