Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • शरद पवारांची प्रकृती गंभीर? डिस्चार्ज मिळणार की नाही? डॉक्टरांनी दिली मोठी माहिती, म्हणाले…
Pune

शरद पवारांची प्रकृती गंभीर? डिस्चार्ज मिळणार की नाही? डॉक्टरांनी दिली मोठी माहिती, म्हणाले…

Sharad Pawar Health Update | मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांना पुण्यातील (Pune) रूबी हॉल क्लिनिक रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. अजित पवार यांच निधन झाल्यानंतर शरद पवारांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्यांना तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती पण पुन्हा काही दिवसांमध्येच त्यांची तब्येत बिघडली. त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

हेही वाचा – वादाची ठिणगी! मालेगाव बांगलादेशी व अतिरेक्यांचा अड्डा, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर…

सध्या शरद पवार यांच्यावर उपचार सुरू असून आता त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. शरद पवारांना डिहायड्रेशन झाल्यामुळे उलट्यांचा त्रास होत होता. त्यामुळे मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर आता डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट दिली आहे.

डॉक्टर काय म्हणाले?

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यामुळे त्यांना आज डिस्चार्ज मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये मोठी सुधारणा झाली असल्याचं सांगितलं जात असून त्यांना चेकअप झाल्यानंतर डॉक्टर डिस्चार्ज देतील.

दरम्यान, मुंबईहून बारामतीकडे जात असताना अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला होता. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पवार कुटुंबांवर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. तसेच ज्यावेळी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला होता त्यावेळी शरद पवार हे मुंबईमध्ये होते. जेव्हा शरद पवारांना या अपघाताची माहिती मिळाली तेव्हा ते तातडीनं बारामतीला दाखल झाले होते.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts