Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • सोलापूर महानगरपालिका निवडणूक: एबी फॉर्मवरून वाद पेटला
ताज्या बातम्या

सोलापूर महानगरपालिका निवडणूक: एबी फॉर्मवरून वाद पेटला

Political leaders during dispute over AB forms in Solapur municipal election

Solapur municipal election AB form dispute : सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक चांगलीच रंगतदार होत असताना भाजपच्या एबी फॉर्मवरून मोठा वाद उफाळून आला आहे. मंगळवारी दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर भाजप नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वेळ संपल्यानंतर भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर हे उमेदवारांचे एबी फॉर्म घेऊन पोहोचल्याने भाजपच्या ३२ उमेदवारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

हे ही वाचा : बृहन्‍मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी 2 हजार 231 नामनिर्देशनपत्र वैध, तर 167 नामनिर्देशन अवैध

महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी कार्यालया बाहेर ठिय्या मांडत, तीन वाजल्यानंतर कोणालाही आत प्रवेश नाही, अशी ठाम भूमिका घेतली. यावेळी भाजप नेत्यांसोबत जोरदार खडाजंगी झाली. बुधवारी संबंधित निवडणूक अधिकारी मरोड यांच्या कडून नेत्यांनी लेखी पत्र घेतले. त्यात दरवाजे बंद झाल्यानंतर खिडकीतून काही कागदपत्रे आली, मात्र ती भाजप उमेदवारांची एबी फॉर्म आहेत की नाही, याबाबत स्पष्टता नसल्याचा उल्लेख आहे.

या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी व शिंदें सेनेच्या नेत्यांनी महापालिका आयुक्त तथा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांना निवेदन देत, ऍड. असीम सरोदे यांच्यामार्फत संबंधित प्रभागातील निवडणूक प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts