Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • राज्यात निवडणुकांना सुरुवात; सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा नागरिकांना निवडणूक आयोगाचे आवाहन
Top News

राज्यात निवडणुकांना सुरुवात; सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा नागरिकांना निवडणूक आयोगाचे आवाहन

Election Commission urging citizens to vote as state elections begin

Election Commission appeal to voters : नागरिकांनी आज घराबाहेर पडून आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आपले अनमोल मत द्यावे, तुमचे एक मत महत्वपूर्ण आहे. त्यामुळे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन निवडणूक आयोग आणि राज्य सरकारने केले आहे.

आज महाराष्टरातील विविध भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, नगर परिषद आणि नगर पंचायतच्या निवडणूका पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून या निवडणुकांसाठी मतदान यंत्रांची (EVM) व्यवस्था करण्यात आली असल्याचे निवडणूक आयोगातर्फे सांगण्यात येत आहे. त्यानुषंगाने मतदानासाठी 17 हजार 367 कंट्रोल युनिट आणि 34 हजार 734 बॅलेट युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी ईव्हीएम मशी बंद पडल्याच्या तक्रारी मतदानाच्या सुरुवातीलाच येत आहे.

राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. आज  सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात होणार असून संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. याबाबतची माहिती निवडणूक आयोगाने दिली असून सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार हा कार्यक्रम होणार असून राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत मिळून 288 सार्वत्रिवक निवडणूक होणार आहे. त्यापैकी आता काही भागातील निवडणुकांना स्थगिती देण्यात आली सून त्या पुढे ढकलण्यात आल्या आहे. त्यानुसार या निवडणूक 20 डिसेंबर रोजी होणार आहेत.

अंबरनाथ : वाळेकर कुटुंबीयांमुळे निवडणूक लांबणीवर

अंबरनाथ नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यास वाळेकर कुटुंब पूर्णपणे जबाबदार असल्याचा गंभीर आरोप भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांनी केला आहे.

नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष साधना वाळेकर यांनी दाखल केलेले अपील न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी उमेदवारीही मागे घेतली. जाणूनबुजून अपील दाखल करून वेळकाढूपणा केला गेला, अशी टीका अभिजित करंजुले पाटील यांनी केली.एका कुटुंबाच्या निर्णयामुळे निवडणूक यंत्रणा, शिक्षक, नागरिकांचे कार्यक्रम आणि संपूर्ण शहर वेठीस धरले गेले, असा आरोप अभिजित करंजुले पाटील केला.

हे ही वाचा : प्रचाराच्या तोफा आज रात्री थंडावणार, १० च्या नंतर जाहिरातीवर बंदी

कोला जिल्ह्यात पाच ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरूवात….

अकोला जिल्ह्यातील चार नगर परिषदा आणि एक नगर पंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे… एकत्रित 1 लाख 81 हजार 781 मतदार मतदानाचा आपला हक्क बजावणार आहेत. तर स्थानिक स्वराज्याच्या 122 जागांसाठी 628 उमेदवार रिंगणात आहेत. अकोला जिल्ह्यात एकत्रित 204 केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरु आहे. आज सकाळी साडे 7 वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी साडे 5 या वेळेपर्यत मतदान पार पडणार आहे.. तब्बल 1 लाख 81 हजार 741 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे….!

धाराशिव मध्ये मतदानाला उत्साहात सुरुवात

मतदानाचा हक्क बजावणारे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नेहा काकडे व त्यांचे पती राहुल काकडे नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे असं आवाहन करण्यात आले आहे.

गोंदियात मतदान प्रक्रियेला सुरुवात… 98 जागांसाठी 209 मतदान केंद्रावरून मतदान…

गोंदिया, तिरोडा नगरपरिषद व सालेकसा, गोरेगाव नगरपंचायतच्या एकूण 98 जागांसाठी आज एकूण 209 मतदान केंद्रांवरून मतदान पार पडणार आहे. या चारही ठिकाणाचे एकूण 1 लाख 65 हजार 881 मतदार मतदानाचा हक्क बजावून निवडणूक रिंगणात असलेल्या 4 नगराध्यक्ष आणि 94 नगरसेवकांच्या भाग्याचा फैसला मतदानाचा हक्क बजावून करणार आहेत….. सकाळच्या सुमारास थंडीचा जोर असल्याने मतदान केंद्रावर सध्या तरी शांतता दिसून येत आहे… जस जसा तापमानाचा पारा वाढेल तस तस मतदारांची देखील गर्दी मतदान केंद्रावर वाढेल

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts