Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • महाराष्ट्राच्या पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार घेणार आज शपथ; 5 वाजेदरम्यान होणार शपथविधी
Top News

महाराष्ट्राच्या पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार घेणार आज शपथ; 5 वाजेदरम्यान होणार शपथविधी

Parth Pawar Rajya Sabha

Sunetra Ajit Pawar Deputy CM oath : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले. गुरुवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांनतर राजकीय वर्तुळात अजि पवारांच्या जागी बसणार कोण ? त्यांच्याकडे असलेल्या पदाचा कार्यभार सांभाळणार कोण यावर चर्चा सुरु झाली. काल वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी चर्चा पर बैठक घेतली होती. या त्यानंतर मध्यरात्री मुंबई येथे मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई येथील देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि मुलगा जय पवार दाखल झाले. आज दुपारी विधान भवनात राष्ट्रवादीच्या नेत्यांसह सर्व आमदारांची बैठक पार पडणार असून संध्याकाळी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बैठकीसाठी बरेच आमदार मुंबईकडे रवाना

या बैठकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेचसे आमदार मुंबईकडे रवाना झाले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे.

महाराष्ट्राच्या पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार घेणार शपथ

आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास विधान भवन येथे राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि सर्व आमदारांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत गटनेता निवडला जाईल. महाराष्ट्राच्या पहिल्याच महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा अजित पवार ह्या शपथ घेऊन विराजमान होणार आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी आणि राष्ट्रीय अध्यक्षपदी देखील त्यांची निवड होण्याची शक्यता आहे.

निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडून – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू – सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी म्हणून. त्यामुळे मी आता आपल्याला एवढंच सांगू शकतो की, अजित दादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांचे जे काही निर्णय होतील, त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडून असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून मी वहिनींचे अभिनंदन करेलप्रताप चिखलीकर

आज राष्ट्रवादी विधीमंडळाची बैठक पार पडणार असून आदरणीय सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित होणार आहे. यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडेल. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून मी वहिनींचे अभिनंदन करेल. एवढा मोठा दुःखाचा डोंगर त्यांच्यावर आणि महाराष्ट्रावर असताना कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून सगळ्या गोष्टीला त्यांनी संमती दिल्याचे मत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts