• Home
  • राजकारण
  • अजितदादांच्या आवडीचे अर्थ खाते सुनेत्रा पवारांना नाहीच! कमी महत्त्वाची ‘ही’ ३ खाते सोपवली..
Top News

अजितदादांच्या आवडीचे अर्थ खाते सुनेत्रा पवारांना नाहीच! कमी महत्त्वाची ‘ही’ ३ खाते सोपवली..

Sunetra Pawar finance portfolio

Sunetra Pawar finance portfolio : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवरा यांनी आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, त्यांना अजित पवार यांच्या आवडीचं आणि जिव्हाळ्याचं अर्थ खातं डावलण्यात आलं आहे. त्याशिवाय सुनेत्रा यांच्याकडे इतर तीन खाते सोपवण्यात आली आहेत. सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थ खातं वगळता इतर तीन कमी महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क, क्रिडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्यांक या खात्यांचा समावेश आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा – सुनेत्रा पवार यांचा मुंबईत शपथविधी, सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना

सुनेत्रा पवार यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक खात्याची जबाबदारी देण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अजित पवारांकडे असलेले अर्थखाते मात्र सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेले नाही. समोर आलेल्या माहितीनुसार हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याकडेच ठेवणार असल्याचे बोलले जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी

फडणवीस यांनी हे खातं स्वतःकडे ठेवले असले तरी, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या खात्याचा आग्रह अद्याप सोडलेला नाही. हे खाते आमच्या पक्षाकडे होते आणि ते आम्हालाच मिळावं अशी आग्रही मागणी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अर्थमंत्री पदावरून महायुतीत वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता भाजप अर्थमंत्रीपदावरील दावा सोडणार का? तसेच राष्ट्रवादीला हे खाते मिळाल्यात या खात्याची जबाबदारी कोण सांभाळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सुनेत्रा पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा सुनेत्रा पवार यांना मिळाला आहे. दरम्यान आता शपथविधी पार पडल्यानंतर सुनेत्रा पवार मंत्रायलात जाणार नसल्याची माहिती समोर आली आहेत. त्या आता बारामतीला जाणार आहे आणि अजित दादांचा दशक्रिया विधा पार पडल्यानंतर त्या पदभार स्वीकारणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts