नवी दिल्ली : भारताचे सरन्यायाधीश (CJI) बी.आर. गवई यांच्यासमोर एका वकिलानं कोर्टरुममध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या वकिलानं सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्नही केल्याचं सांगण्यात येतंय. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी वकिलाला ताबडतोब ताब्यात घेतलं. दरम्यान, संपूर्ण घटनेत न्यायमूर्ती गवई शांत राहिले आणि न्यायालयाचं कामकाज नेहमीप्रमाणे सुरु राहिलं. त्यांनी सांगितलं की “या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही.”
नेमकं काय घडलं :
वकिलानं डेस्कवर जाऊन आपला बूट काढून न्यायाधीशांवर फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप करुन त्यांना बाहेर काढले. ते निघून जाताना ते असं म्हणताना ऐकू आलं की, “आम्ही सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही.” या घटनेनं सरन्यायाधीशांना काहीही फरक पडला नाही आणि त्यांनी कोर्टरूममध्ये उपस्थित असलेल्या इतर वकिलांना त्यांचे युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगितलं. ते म्हणाले, “या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आम्हाला काहीही फरक पडत नाही. या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही.” प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, तात्काळ कारवाई करण्यात आली आणि न्यायालयाच्या आवारात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
An incident occurred today in the court of Chief Justice of India BR Gavai, as a lawyer tried to throw an object at him.
Security personnel present in court intervened and escorted the lawyer out and detained.
While being escorted out of the courtroom, he uttered “Sanatan ka… pic.twitter.com/7JdNWwvEdE
— ANI (@ANI) October 6, 2025
मुख्य न्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न का करण्यात आला? :
या घटनेवर प्रतिक्रिया देताना एका वकिलानं म्हटलं आहे की, “आजची घटना खूप दुःखद आहे. जर एखाद्या वकिलानं न्यायालयात आणि तेही न्यायालयात एखाद्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असेल, तर आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो. तो आमच्या बारचा सदस्य आहे. आम्ही नुकतीच चौकशी केली आणि आम्हाला कळले की तो 2011 पासून सदस्य आहे.”
वकिलानं केली कारवाईची मागणी :
त्यांच्या निवेदनात वकिलानं म्हटलं आहे की, “ही एक अतिशय दुःखद घटना आहे. म्हणूनच, आपण असं म्हणू शकतो की त्यानं भगवान विष्णूच्या प्रकरणांमध्ये माननीय सरन्यायाधीशांनी केलेल्या टिप्पणीविरुद्ध हा प्रयत्न केला (वकिलानं बूट फेकण्याचा प्रयत्न केला). ही एक अतिशय दुःखद घटना आहे. आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो आणि जर ही घटना खरी असेल तर कारवाई केली पाहिजे.”