Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • जिल्हा परिषदांचा धुरळा उडणार! १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणुका पूर्ण करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Top News

जिल्हा परिषदांचा धुरळा उडणार! १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणुका पूर्ण करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

Supreme Court Election Deadline

Supreme Court Zilla Parishad Election Order : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु असताना राज्य निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषदा निवडणुका घेण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. पण राज्य निवडणूक आयोगाकडून सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपुढे वाढवलेली नाही, तिथे 10 दिवसांची मुदतवाढ द्यावी अशी राज्य निवडणूक आयोगाकडून मागणी करण्यात आली होती.

हेही वाचा – एकटे पडलो तरी कॉफी आहोत, राज ठाकरेंची मुंबईत मराठी नागरीकांना साद

ही मागणी आता सुप्रीम कोर्टाने मान्य केली आहे. कोर्टाने अजून पाच दिवस जास्त दिले आहेत. त्यामुळे 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ज्या जिल्हा परिषदांमध्ये ओलांडली गेलेली नाही, त्या निवडणुका 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करता येणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाला मिळालेला हा मोठा दिलासा आहे. त्यामुळे असं म्हटलं जात होतं की, महानगरपालिकेच्या निवडणुका सुरु असताना जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागू शकतात, त्यासाठी आता राज्य निवडणूक आयोगाला थोडा दिलासा मिळाला आहे.

उर्वरित जिल्हा परिषदांसाठी 21 जानेवारीला सुनावणी

कोर्टाकडून हा दिलासा फक्त 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीसाठी आहे, ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांच्यापुढे ओलांडली गेलेली नाही. त्यासाठी दिलासा दिलेला आहे. इतर सर्व जिल्हा परिषदांबाबत पुन्हा 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे. सध्या महापालिका निवडणुकांची धामधूम सुरु आहे. महापालिकेच्या निवडणुका 15 जानेवारीला होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी आहे. मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts