Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • उद्या दुपारी १२ वाजता ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा; संजय राऊत
Top News

उद्या दुपारी १२ वाजता ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा; संजय राऊत

Thackeray brothers alliance announcement

Thackeray brothers alliance announcement : मागील काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधु एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगत होत्य. मात्र, त्याला काही मुहूर्त मिळत नव्हता. अखेर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उद्या दुपारी १२ वाजता ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती दिली आहे. राऊत यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. त्यानी आपल्या एक्स या सोशल मिडिया अकाउंटवर याबाबतची माहिती शेअर केली आहे. मागील दोन महिन्यांपासून रंगणाऱ्या ठाकरे बंधुंच्या युतीच्या चर्चेला उद्या अखरे पूर्णविराम मिळणार का ? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा – उपमुख्यमंत्री अजित पवार करणार महाविकास आघाडीत प्रवेश ? चर्चांना उधाण

महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष काँग्रेसला सोडून आपले बंधु राज ठाकरे यांच्यासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे जागावाटप, प्रचाराची दिशा, निवडणूक रणनीती यावर एकमत झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेत मराठी महापौर बसवण्याच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधु आग्रही असल्याचं सांगण्यात आलं आहे. या युतीची घोषणा झाल्यास मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून या युतीच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, खासदार राऊत यांनी ट्विटमध्ये ठाकरे बंधू युतीची घोषणा कुठे करणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे एका हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीची घोषणा करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पत्रकार परिषदेत कोण किती जागांवर लढणार आणि कुठल्या महापालिकेसाठी युतीत लढणार हे देखील स्पष्ट होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे उद्या १२ वाजता शिवसेना (ठाकरे) आणि मनसे यांच्या युतीचे चित्र स्पष्ट होईल.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts