Thackeray Sena mega induction : राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मागील काही दिवसांमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळत आहेत. उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी पक्षांतर केले आहे. यामुळे अनेक पक्षांना निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आता प्रचाराला सुरुवात झाल्यानंतरही पक्षांतर सुरुच आहे. अनेक नेते आणि पदाधिकारी अजूनही दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचे पहायला मिळत आहे. अशातच आता ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
हेही वाचा – भाजप- अजित पवार गटात संघर्ष पेटला! अजित पवारांचा हल्ला भाजपचा प्रतिहल्ला
मुंबई महापालिकेत ठाकरे सेना आणि शिंदे गट यांच्यात प्रमुख लढत
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रमुख लढत पहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आता प्रचाराला सुरुवात केली आहे. या काळात एकमेकांवर जोरदार टीका केला जाण्याची शक्यता आहे. अशातच आता एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील कांदिवली पूर्व प्रभाग क्रमांक २८ मधील हनुमान नगर येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
खडकवासला येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाचे शहर उपाध्यक्ष राहुल बाबासाहेब घुले पाटील ह्यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी मनगटावर शिवबंधन बांधून स्वागत केले. ह्यावेळी शहरप्रमुख… pic.twitter.com/tYgnnPKgif
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 3, 2026
शिंदे यांच्या शिवसेनेतून ठाकरेंच्या शिवसेनेत मेगा पक्षप्रवेश
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या महिला शाखासंघटक अश्विनी पवार, उपशाखाप्रमुख भरत पाटील, उपशाखाप्रमुख विनोद गुजर, उपशाखाप्रमुख विजय यादव, उपशाखाप्रमुख गणेश खंदारे, उपशाखाप्रमुख महेश शर्मा, उपशाखाप्रमुख सुधाकर पाटील यांचा समावेश आहे. या सर्वांनी आज मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी विभागप्रमुख संतोष राणे, उपविभागप्रमुख प्रशांत कोकणे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
खडकवासला येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाचे शहर उपाध्यक्ष राहुल बाबासाहेब घुले पाटील ह्यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी मनगटावर शिवबंधन बांधून स्वागत केले. ह्यावेळी शहरप्रमुख… pic.twitter.com/tYgnnPKgif
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 3, 2026
ठाकरेंच्या सेनेकडून काँग्रेसला मोठं खिंडार
गोरेगाव वॉर्ड क्रमांक 50 मधील काँग्रेसचे मुंबई जनरल सेक्रेटरी अनिल शर्मा आणि टीना शर्मा यांनीही आज ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून या सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, विभागप्रमुख संतोष राणे, गोरेगाव विधानसभा संघटक राजू पाध्ये, मालाड विधानसभाप्रमुख कैलास कणसे, उपविभागप्रमुख दिनेश राव हे नेते उपस्थित होते.
गोरेगाव वॉर्ड क्रमांक ५० मधील काँग्रेसचे मुंबई जनरल सेक्रेटरी अनिल शर्मा आणि टीना शर्मा ह्यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी मनगटावर शिवबंधन बांधून स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना सचिव आमदार… pic.twitter.com/QfMxIGul2O
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 3, 2026












