Uddhav Thackeray demands farm loan waiver : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असताना त्यांनी अनेक शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. तसेच शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी देखील केली असून कर्जमुक्तीच्या विषयावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत असताना त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी मागणी लावून धरली असून ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. उद्धव ठाकरे हे 7 नोव्हेंबर पर्यंत मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. ते विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेट देऊन त्यांच्या नुकसानग्रस्त शेताची पाहणी करत आहेत.
केंद्रीय पथक झालेल्या नुकसानीची पाहणी मोबाईलची बॅटरी लावून करत असल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तर भाजपासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी जोरदार टीका करत अजित पवारांना देखील निशाण्यावर धरले आहे.
तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा सुरू केली आहे
पिक विमाचे 40 ते 50 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळायला हवे होते. मोसंबी पिकाला देखील 80 हजार मिळायला हवे होते. याशिवाय अकोल्यात पिकविमाचे पैसे मिळाले परंतु फक्त दोन आणि तीन रुपयेमिळालेत. तर पालघर मध्ये देखील अडीच रुपये मिळाले. अशाप्रकारे तुम्ही शेतकऱ्यांची थट्टा सुरू केली आहे. असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचा आजपासून मराठवाड्यातील शेतकरी बांधवांसोबत संवाद सुरू झालाय.
महायुती सरकारच्या पोकळ आश्वासनांनी दगा दिल्यावर, बळीराजाच्या हातात शून्य उरलाय. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे, असा धीर आपल्या संवादातून… pic.twitter.com/04duQMm5Qw— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 5, 2025
मी हा विषय सोडणार नाही
आता जर कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होईल. आता कर्जमाफी नाही भेटली तर खरिपाची कर्जमाफी मिळणार का ? 30 जूनला कर्जमाफी देणार असेल तर तोपर्यंत हप्ते भरायचे की नाही ? भरायचे असेल तर कुठून भरायचे ? कर्जमाफी करण्यासाठी आधी माती तर द्या, मग कर्जमाफी द्या असं म्हणत त्यांनी मी हा विषय सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं.
पॅकेज मान्य नाही पण जे जाहीर केले ते तरी द्या (Uddhav Thackeray demands farm loan waiver)
ते म्हणालेत की, कर्जमुक्ती करा. तसेच सरकारने जाहीर केलेले पॅकेज आम्हाला मान्य नसल्याचे देखील उद्धव ठाकरे म्हणालेत. पॅकेज मान्य नाही पण जे जाहीर केले ते तरी द्या कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जमाफी ही झालीच पाहिजे असं म्हणत उद्धव ठाकरे हे आक्रमक भूमिका घेताना दिसले.












