Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • ….तर माणिकराव कोकाटेंना अटक होणार ? अँजिओग्राफीचा अहवाल न्यायालयात सादर करणार
Top News

….तर माणिकराव कोकाटेंना अटक होणार ? अँजिओग्राफीचा अहवाल न्यायालयात सादर करणार

Manikrao Kokate during court proceedings as angiography report to be submitted, arrest speculation continues

Manikrao Kokate arrest news : नाशिक येथील सदनिका घोटाळा प्रकरण सध्या चांगलंच तापल्याचे दिसत आहे. या प्रकरणात दोषी आढळलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे याना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. परंतु आता त्यांची प्रकृती स्थिर नसल्याने कायदेशीर कारवाई आता निर्णयात्मक ठरण्याची शक्यता आहे.

वैद्यकीय अहवालाची मांग

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सध्या मुंबई येथील लीलावती रुग्णालयात अँजिओग्राफी करण्यात आली आहे. पोलिसांनी आता अँजिओग्राफी संदर्भातील वैद्यकीय अहवालाची मांग केली आहे. या अहवालातून त्यांची प्रकृती स्थिर वाटल्यास त्यांना आजच्या आजच अटक होऊ शकते. हा अँजिओग्राफीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. सध्या पोलीस त्यांना अटक करण्यासाठी लिलावती रुग्णालयात गेल्या दीड तासांपासून तळ ठोकून बसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

हे ही वाचा : क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे कसे अडकले? बंदुकीचा परवाना अन् अल्प उत्पन्न हा विरोधाभास घेऊन गेला 2 वर्षांच्या शिक्षेच्या दिशेने संपूर्ण घटनाक्रम

मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध

लिलावती रुग्णालय आणि प्रशासन दुपारी 4 वाजेच्या सुमारास मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करणार आहे. यावेळी माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृतीबद्दल अधिकृत माहिती सादर करण्यात येणार असून सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. त्यांना कोणताही मानसिक तणाव येणार नाही याची काळजी घेतली जात असून हॉस्पिटल मध्ये त्यांची पत्नी आणि मुलगी उपस्थित आहे.

30 वर्ष जुने प्रकरण आले अंगलट

सदनिका घोटाळा प्रकरणात मंत्री कोकाटे यांनी फ्लॅट लाटण्याच्या अगोदर 30 वर्षांपूर्वी बंदुकीचा परवाना मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न अंगलट आला. त्यांनी आपल्याकडील रोकड सुरक्षितपणे हाताळण्यासाठी बंदुकीच्या परवान्याची मागणी केली होती. कोकाटे यांनी 1994 मध्ये जिल्हा प्रशासनाने त्यासंबंधीचा अर्ज सादर केला होता. या अर्जात त्यांनी आपले उत्पन्न व व्यवसाय मोठा असल्याचे भासवले होते. त्या अर्जात नमूद केल्यानुसार त्यांच्याकडे 40 ते 50 कामगार कामाला होते. या कामगारांना दर आठवड्याला 9 हजार रुपये रोख पगार द्यावा लागत होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम हाताळत असल्याने आपल्या सुरक्षेसाठी बंदूक आवश्यक आहे, असे त्यांनी आपल्या अर्जात म्हटले होते. पण हाच दावा कोर्टात त्यांच्याविरोधात गेला. अल्प उत्पन्न गटातून घर घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न 30 हजारांच्या आत असणे बंधनकारक होते.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts