earthquake in India’s neighbouring country : सोमवारी पहाटे उत्तर अफगाणिस्तानला शक्तिशाली भूकंपाचा धक्का बसला. अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षण (USGS) नुसार, मजार-ए-शरीफ शहर आणि खुल्म शहराजवळ सुमारे 28 किलोमीटर जमिनीखाली 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला. सोमवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार पहाटे 1 वाजताच्या सुमारास हा भूकंप जाणवला, ज्यामुळं बल्ख प्रांत आणि आसपासच्या परिसरात घबराट पसरली. उत्तर अफगाणिस्तानातील एक प्रमुख आणि दाट लोकवस्ती असलेले शहर मजार-ए-शरीफ भूकंपाच्या केंद्रापासून फार दूर नव्हतं.
अनेकांचा मृत्यू :
USGS नुसार, या भूकंपात मोठी जीवितहानी झाल्याची भीती आहे. आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे आणि 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार शेकडो लोक मृत किंवा जखमी झाले आहेत. अनेक घरं आणि इमारती कोसळल्याची भीती आहे. भारताची राजधानी दिल्लीपर्यंत हा भूकंपाचे धक्के जाणवले, जे पहाटे 2 वाजताच्या सुमारास धक्के बसले, ज्यामुळं रात्री उशिरापर्यंत भीतीचं वातावरण निर्माण झालं. अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं सांगितलं की “देशातील अनेक प्रांत पुन्हा एकदा पहाटे १ वाजताच्या सुमारास जोरदार भूकंपाने हादरलं.”
Footages from afghanistan After Earthquake of 6.3 Magnitude …. #Afghanistan #Earthquake pic.twitter.com/8uksGBTo1y
— INDIAN (@hindus47) November 3, 2025
शेजारील देशांमध्येही जाणवले भूकंपाचे धक्के :
हे धक्के केवळ अफगाणिस्तानपुरते मर्यादित नव्हते, तर ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि पाकिस्तानपर्यंतही जाणवले. चारही शेजारील देशांमधील लोक घराबाहेर पडले आणि काही भागात वीजही खंडित झाली. USGS च्या PAGER प्रणालीनं या भूकंपासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, म्हणजेच मानवी आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. एजन्सीनं म्हटलं आहे की “महत्त्वपूर्ण नुकसान आणि मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे; ही एक प्रादेशिक आपत्ती ठरु शकते.”
हे हि वाचा : राजस्थानमध्ये मोठा अपघात! रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रेलरला टेम्पो ट्रॅव्हलर धडकली; 15 जणांचा मृत्यू
अफगाणिस्तानमध्ये वारंवार भूकंप (earthquake in India’s neighbouring country)
वारंवार गेल्या काही महिन्यांपासून अफगाणिस्तानमध्ये वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. ऑगस्टमध्ये 6.0 रिश्टर स्केलच्या भूकंपात किमान 800 लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे 2800 लोक जखमी झाले. ऑक्टोबर 2023 मध्ये, पश्चिम अफगाणिस्तानमध्ये 6.3 रिश्टर स्केलच्या भूकंपात 2000 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले












