Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राज्य
  • दुर्दैवी अपघात! कारवर भरधाव डंपर पलटला, अंत्यसंस्काराला जाणाऱ्या एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
Top News

दुर्दैवी अपघात! कारवर भरधाव डंपर पलटला, अंत्यसंस्काराला जाणाऱ्या एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू

Overturned dumper lying on top of a crushed car after a tragic accident killing seven family members

Dumper overturn car seven family members killed : उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील गगलहेरी पोलीस स्टेशन परिसरात शुक्रवारी सकाळी एक मोठा अपघात घडला. खनिजांनी भरलेला एक भरधाव डंपर नियंत्रण गमावून एका कारवर उलटला. यात एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तसंच एका वाटसरुलाही धडक बसली, ज्याची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरुन पळून गेला. या घटनेनंतर लगेचच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं घटनास्थळी जमले, ज्यामुळं रस्त्याच्या दोन्ही बाजूला बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या पोलीस दलासह आले आणि नाकाबंदी हटवण्याचा आणि गर्दी शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रामस्थांनी उच्च अधिकाऱ्यांना बोलावण्याचा आग्रह धरला.

अंत्यसंस्काराला जात होतं कुटुंब :

वृत्तानुसार, सय्यद माजरा येथील रहिवासी महेंद्र सैनी यांच्या मेहुण्यांचं गुरुवारी रात्री निधन झालं. त्यामुळं शुक्रवारी सकाळी महेंद्र सैनी त्यांच्या कुटुंब आणि नातेवाईकांसह अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी जात होते. या गाडीत महेंद्र, महेंद्रची पत्नी राणी देवी, मुलगा संदीप (24), मुलगी जूली (27), नातू (4 वर्षे), जावई शेखर कुमार (28), मेहुण्याचा मुलगा विपिन (20) आणि नातेवाईक राजू सैनी (27) हे होते. ते गावाबाहेर पडताच, एका वेगानं येणाऱ्या डंपरनं अचानक नियंत्रण गमावले आणि कारवर उलटली. स्फोटासारख्या आवाजानं संपूर्ण परिसर हादरला. क्षणार्धात कार पूर्णपणे चिरडली गेली आणि त्यात बसलेल्या सर्वांचा मृत्यू झाला.

 

मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त :

या अपघाताची माहिती मिळताच, गगलहेडी पोलीस ठाण्याचे सीओ सदर आणि वाहतूक पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव आणि मदत कार्य सुरु केलं. वाहन काढून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ग्रामस्थांच्या गर्दीमुळं वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुःखद अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना तातडीनं घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे आणि जखमींना शक्य तितकी सर्व वैद्यकीय सेवा देण्याचे निर्देश दिले आहेत.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts