Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • ‘वडील जिवंत असल्याचा पुरावा द्या’, इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवांदरम्यान मुलाची सोशल मीडिया पोस्ट
Top News

‘वडील जिवंत असल्याचा पुरावा द्या’, इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवांदरम्यान मुलाची सोशल मीडिया पोस्ट

Imran Khan pictured amid circulating death rumours, with his son addressing the situation on social media

Imran Khan death rumours son post : पाकिस्तानच्या तुरुंगात कैद माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवांनी लोकांना धक्का बसला आहे. दुसरीकडे, इम्रान खान यांच्या बहिणींनी दावा केला आहे की, त्यांना आपल्या भावाला भेटण्यापासून सुमारे 23 दिवसांपासून रोखलं जात आहे. दरम्यान, तुरुंग प्रशासनानं स्पष्ट केलं आहे की, इम्रान खान यांच्या मृत्यूच्या बातम्या खोट्या आहेत.

इम्रान खान तुरुंगात कैद :

खरं तर, माजी पंतप्रधान इम्रान खान हे पंजाब प्रांतातील अदियाला तुरुंगात कैद आहेत. तुरुंग प्रशासनानं सांगितलं की, ते पूर्णपणे सुरक्षित आणि स्वस्थ आहेत. दरम्यान, इम्रान खान यांचा मुलगा कासिम खान यांनी आता आपले वडील जिवंत असल्याचा पुरावा मागितला आहे. तसंच, त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, अफगाणिस्तानमधील एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू झाला आहे.

 

मुलानं मागितला जिवंत असल्याचा पुरावा :

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका पोस्टमध्ये कासिम खान यांनी म्हटलं आहे की, त्यांच्या वडिलांना अटक होऊन सुमारे 845 दिवसांहून अधिक काळ लोटला आहे. कासिम खान यांनी दावा केला की, गेल्या दीड महिन्यांपासून त्यांचे वडील आणि कुटुंबायांचा कोणताही संपर्क होऊ दिला नाही. त्यांना डेथ सेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. कासिम खान यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, गेल्या 6 आठवड्यांपासून त्यांच्या वडिलांना पूर्णपणे एकटं डेथ सेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. न्यायालयाचा स्पष्ट आदेश असूनही, त्यांच्या बहिणींना इम्रान खान यांना भेटू दिलं जात नाही. कोणतेही फोन कॉल नाहीत, कोणतीही भेट नाही, आणि त्यांच्या प्रकृतीची कोणतीही बातमी नाही. मी आणि माझा भाऊ वडिलांशी कोणत्याही प्रकारे संपर्क साधू शकलो नाही. याशिवाय कासिम यांनी आंतरराष्ट्रीय समुदाय आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांकडेही हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. कासिम यांनी अनेक मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये त्यांच्या वडिलांच्या जिवंत असल्याची पुष्टी, न्यायालयाच्या आदेशानुसार भेटीची परवानगी, अमानवीय एकांतवासाचा अंत इत्यादींचा समावेश आहे.

हे ही वाचा : व्लादिमीर पुतिन पुढील महिन्यात दोन दिवसीय भारत दौऱ्यावर; राष्ट्रपती मूर्मू आणि पंतप्रधान मोदींची घेणार भेट

इम्रान खान यांच्या मानवाधिकारांचा सम्मान करा :

संयुक्त राष्ट्रांच्या उप-प्रवक्त्यानं पुन्हा पुन्हा सांगितलं की, जागतिक संस्थेनं पाकिस्तानी अधिकाऱ्यांना इम्रान खान यांच्या मानवाधिकारांचा आणि न्यायिक प्रक्रियेच्या अधिकारांचा निश्चितपणे आदर करण्यास सांगितलं आहे. हे त्यांच्या अटकेनंतर आणि सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईनंतर घडलं आहे. संयुक्त राष्ट्रांनी असे ठामपणे सांगितलं आहे की, अशा राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणांमध्ये कायद्याच्या आधारे योग्य वागणूक आणि प्रक्रियात्मक न्याय अत्यावश्यक आहे.

img

मी वेबसाईट साठी प्रभावी लिखाण करते. यासह अँकरिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधण्याची आवड आहे. क्रिएटिव्ह कंटेन्ट लिहिणे, कार्यक्रमाचे निवेदन करणे ही माझी आवड असून मी पत्रकारिता आणि जनसंवाद या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts