Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • Gudi Padwa 2026: या वर्षी गुढी पाडवा कधी आहे? जाणून घ्या महत्त्व आणि परंपरा
धार्मिक

Gudi Padwa 2026: या वर्षी गुढी पाडवा कधी आहे? जाणून घ्या महत्त्व आणि परंपरा

Gudi Padwa 2026

Religious and Historical Significance of Gudi Padwa 2026: चैत्र शुल्क पक्षाची प्रतिपदा १९ मार्च २०२६ रोजी आहे. याच दिवशी महाराष्ट्रात गुढी पाडवा साजरा केला जाणार आहे. गुढी पाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते.

भारताच्या विविध भागात नवीन वर्ष वेगवेगळ्या परंपरेनुसार साजरे केले जाते. गुढीपाडवा हा त्यापैकीच एक सण आहे, जो नववर्षाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. गुढी पाडवा चैत्र प्रतिपदा, गुढी पाडवा, नवसंवत्सर, उगादी, चेती चंद, युगादी अशा विविध नावांनी ओळखल्या जातात. गुढीपाडव्याला महाराष्ट्राच्या नवीन वर्षाची सुरुवात होते आणि तो मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महाराष्ट्राबरोबरच गोवा, दक्षिण भारत आणि भारताच्या इतर भागातही गुढीपाडवा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

हेही वाचा: Yoga for Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? मग रोज करा ही 5 योगासनं अन् मिळवा अनेक फायदे

गुढी पाडवा २०२६ तारीख

दिनदर्शिकेनुसार, चैत्र महिन्यातील शुल्क पक्षातील प्रतिपदा तिथीपासून गुढीपाडवा सुरू होतो. प्रतिपदा तिथी १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ०६ वाजून ५२ मिनिटांनी संपेल आणि २० मार्च रोजी पहाटे ०४ वाजून ५२ मिनिटांनी सुरू होईल. उगवत्या तिथीनुसार, १९ मार्च २०२६ रोजी गुढी पाडवा साजरा केला जाईल. चैत्र नवरात्र देखील याच दिवशी सुरू होईल.

गुढी पाडव्याचे महत्त्व
गुढी पाडव्याला हा एक अतिशय शुभ दिवस मानला. हिंदू धर्मात गुढी पाडवा साजरा करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. कोणी घराच्या बाहेर किंवा छतावर गुढी उभा करतात. तर काही जण भगवा झेंडा घराच्या बाहेर किंवा छतावर लावतात.

 

गुढी पाडव्याच्या दिवशी कोणता नैवेद्य केला जातो?

प्रत्येक घराण्याची परंपरा आणि पद्धत वेगवेगळी असते. काही ठिकाणी गुढी उभारल्यानंतर नैवेद्य म्हणून गूळ, खोबरं आणि शेवया अर्पण केल्या जातात. तर काही ठिकाणी कैरी, कडुलिंब, गूळ आणि धणे एकत्र करून त्याचे पाणी तयार केले जाते आणि ते नैवेद्य म्हणून ठेवले जाते. नंतर हेच पाणी घरातील सर्व जण प्रसाद म्हणून ग्रहण करतात.

असे मानले जाते की ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली.

सत्ययुगाची सुरुवात चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून झाली असे मानले जाते.

इतिहासानुसार, छत्रपती शिवाजी महाराज या दिवशी जिंकले असते, म्हणून लोक हिंदुत्वाच्या विजयाचे प्रतीक म्हणून घराबाहेर गुढी आणत असत.

गुढी पाडवा ही केवळ नवीन वर्षाची सुरुवात नाही तर ती संस्कृती, ऐतिहासिक महत्त्व आणि धार्मिक भक्तीचा सण आहे.

हेही वाचा: Ram Navami 2026: यंदा रामनवमी कधी 26 की 27 मार्च? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा कशी करावी

 

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts