Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • SpaceX लिस्ट होताच पैशांचा पाऊस? पहिल्याच दिवशी शेअरने गुंतवणूकदारांना दिला मोठा नफा!
ताज्या बातम्या

SpaceX लिस्ट होताच पैशांचा पाऊस? पहिल्याच दिवशी शेअरने गुंतवणूकदारांना दिला मोठा नफा!

SpaceX IPO

SpaceX IPO: अमेरिकेतील अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी SpaceX ने शेअर बाजारात प्रवेश करताच गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले. पहिल्याच दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी हालचाल दिसून आली. नेमकं काय घडलं, ते जाणून घेऊया

अमेरिकेतील अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी SpaceX ने शेअर बाजारात प्रवेश करताच गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले. कंपनीच्या शेअरमध्ये पहिल्याच दिवशी मोठी वाढ नोंदवली गेली. ज्यामुळे तिचे बाजारमूल्य झपाट्याने वाढले आहे. या वाढीमुळे कंपनीचे संस्थापक एलन मस्क यांच्या एकूण संपत्तीतही लक्षणीय भर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा : जिल्हाधिकारी कार्यालयात डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर; बोगस प्रमाणपत्राचे राॅकेट उघड

पहिल्याच दिवशी जोरदार तेजी

नॅस्डॅक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यानंतर SpaceX च्या शेअरला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रारंभिक किमतीच्या तुलनेत शेअरमध्ये मोठी वाढ दिसून आली आणि दिवसअखेर तो उच्च स्तरावर बंद झाला. या कामगिरीमुळे कंपनीचे बाजारमूल्य जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या श्रेणीत पोहोचल्याचे मानले जात आहे.

एका शेअरची किंमत किती?

उपलब्ध माहितीनुसार, कंपनीचा शेअर सुरुवातीला १३५ डॉलरच्या आसपास उपलब्ध होता. व्यवहारादरम्यान त्यात मोठी वाढ झाली आणि बाजार बंद होताना तो सुमारे १६०.९६ डॉलरवर स्थिरावला. भारतीय चलनात रुपांतर केल्यास एका शेअरची किंमत अंदाजे १५ हजार रुपयांपेक्षा अधिक होते.

आयपीओला विक्रमी प्रतिसाद

SpaceX च्या सार्वजनिक समभाग विक्रीला (IPO) संस्थात्मक तसेच किरकोळ गुंतवणूकदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. उपलब्ध अहवालांनुसार, कंपनीच्या शेअर्ससाठी मागणी ही उपलब्ध समभागांच्या तुलनेत अनेक पटीने जास्त होती. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांना अपेक्षित प्रमाणात शेअर्स मिळू शकले नाहीत.

एलन मस्क यांची प्रतिक्रिया

कंपनीच्या यशाबद्दल बोलताना एलन मस्क यांनी सुरुवातीच्या संघर्षांच्या आठवणींना उजाळा दिला. मर्यादित संसाधनांमधून सुरू झालेल्या कंपनीने जागतिक स्तरावर एवढी मोठी झेप घेतल्याचा त्यांना अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीच्या काळात कंपनीच्या भवितव्याबाबत अनेक आव्हाने होती, असेही त्यांनी नमूद केले.

जुन्या विक्रमांना मागे टाकले

SpaceX च्या आयपीओने जागतिक भांडवली बाजारातील अनेक विक्रम मोडल्याची चर्चा आहे. याआधी सर्वात मोठ्या आयपीओंपैकी एक मानल्या जाणाऱ्या सौदी अरेबियातील तेल कंपनी अरामकोच्या विक्रमालाही या घडामोडींनी मागे टाकल्याचे सांगितले जात आहे.

SpaceX च्या लिस्टिंगमुळे अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीबाबतचा उत्साह आणखी वाढला असून पुढील काळात कंपनीच्या कामगिरीकडे जगभरातील गुतंवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts