Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • अफगाणिस्तानविरुद्ध विक्रमी धावांचा पाठलाग; न्यूझीलंडची टी-20 विश्वचषकात विजयी सुरुवात
Top News

अफगाणिस्तानविरुद्ध विक्रमी धावांचा पाठलाग; न्यूझीलंडची टी-20 विश्वचषकात विजयी सुरुवात

New Zealand Beat Afghanistan

New Zealand Beat Afghanistan : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 मध्ये न्यूझीलंडनं चौथ्या सामन्यात सहज विजय मिळवत आपलं खातं उघडलं. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या ग्रुप डी सामन्यात, टिम सेफर्टच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडनं अफगाणिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला. फिरकीला अनुकूल असलेल्या चेन्नईच्या खेळपट्टीवर अफगाणिस्तानला फेव्हरिट मानलं जात होतं आणि सुरुवातीला ते सामन्यात पुढं असल्याचं दिसून आलं, परंतु न्यूझीलंडच्या फलंदाजांनी लढाऊ कामगिरी करत 183 धावांचं लक्ष्य 13 चेंडू शिल्लक असताना गाठलं. यासह, न्यूझीलंडनं 2024 च्या विश्वचषकातील त्यांच्या पराभवाचा बदला घेतला. विशेष म्हणजे 175 पेक्षा जास्त धावा केल्यानंतरही अफगाणिस्ताननं टी-20 आंतरराष्ट्रीय सामना गमावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

84 धावांनी झाला होता पराभव :

आजपासून बरोबर 610 दिवसांपूर्वी, 8 जून 2024 रोजी, अफगाणिस्ताननं टी-20 विश्वचषकात न्यूझीलंडला फक्त 75 धावांत गुंडाळलं होतं. त्या सामन्यात अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी उत्तम कामगिरी केली आणि 84 धावांनी शानदार विजय मिळवला. परिणामी, चेन्नईच्या खेळपट्टीवरही अशाच कामगिरीची अपेक्षा होती. विशेषतः भारताविरुद्धच्या अलिकडच्या टी-20 मालिकेत कीवी फलंदाजांना फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करावा लागला होता, तेव्हा अफगाणिस्तान एक भयानक आव्हान ठरत होता.

गुलबदिन नायबचं आक्रमक अर्धशतक :

सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानची सुरुवात चांगली झाली. त्यांचा पहिला बळी 6व्या षटकात झद्रानच्या रुपात पडला, तो 35 धावांवर बाद झाला. त्यानंतर फर्ग्युसननं त्याच षटकात गुरबाजला बाद केलं. 10 षटकांनंतर अफगाणिस्तानची धावसख्या 2 बाद 72 होती. दरम्यान सेदिकुल्ला अटल आणि गुलबदिन नायब यांच्यात उल्लेखनीय भागीदारी झाली. दोघांनी आक्रमक फलंदाजी करत 51 चेंडूत 79 धावा जोडल्या. मात्र, 15व्या षटकात अटलची विकेट पडली. यादरम्यान नायबनं फक्त 29 चेंडूत अर्धशतक झळकावलं. त्याच्या खेळीमुळं अफगाणिस्ताननं न्यूझीलंडसाठी 183 धावांचे लक्ष्य ठेवलं. लॉकी फर्ग्युसन न्यूझीलंडसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, त्यानं दोन बळी घेतले.

न्यूझीलंडच्या टिम सेफर्टचं अर्धशतक :

अफगाणिस्ताननं दिलेल्या 183 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या षटकात कीवींच्या लागोपाठ दोन विकेट पडल्या. फिन अॅलन आणि रचिन रवींद्र सलग चेंडूवर बाद झाले. मात्र, यानंतर ग्लेन फिलिप्स आणि टिम सेफर्ट यांच्यात चांगली भागीदारी झाली. फिलिप्सला 25 चेंडूत 42 धावांवर रशीद खाननं बोल्ड केलं. त्यानंतर टिम सेफर्टनं शानदार कामगिरी करत 42 चेंडूत 65 धावा केल्या. या दोन विकेट्स गमावल्यानंतर मार्क चॅपमन आणि डॅरिल मिशेलनं दमदार फलंदाजी केली. पण 16 व्या षटकात चॅपमनची विकेट पडली. चॅपमननं 17 चेंडूत 28 धावा केल्या. शेवटी 18व्या षटकात न्यूझीलंडनं सामना जिंकला. अफगाणिस्तानकडून गोलंदाजीत मुजीब-उर-रहमाननं सर्वाधिक 2 विकेट घेतल्या.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts