Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • १२ परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकांची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान ७ ला मतमोजणी
Top News

१२ परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकांची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान ७ ला मतमोजणी

District Council Panchayat Samiti Elections Announcement

District Council Panchayat Samiti Elections Announcement : बहुप्रतिक्षित जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची राज्य निवडणूक आयोगाने घोषणा केलीय. राज्यातील १२ परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकांची घोषणा आज राज्य निवडणुक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी केला आहे. यासाठी ५ फेब्रुवारीला मतदान ७ ला मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याने आजपासून सदर जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता लागली आहे. या निवडणुकीसाठी मतदान ५ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. तसंच मजमोजणी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेपासून करण्यात येणार आहे.

हेही वाचा – जिल्हा परिषद, पंचायत समितीचा धुराळा उडणार, आज निवडणूक आयोग करणार घोषणा..

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी १६ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर अर्जाची छानणी २२ जानेवारी रोजी होईल आणि उमेदवारी माघारीची अंतिम तारीख २७ जानेवारी असणार आहे. अंतिम उमेदवारांची यादी आणि चिन्ह वाटप- २७ जानेवारी दुपारी साडेतीन वाजेनंतर होईल. ही निवडणूक २५ हजार ४८२ मतदान केंद्रांद्वारे निवडणूक घेण्यात घेण्यात आहे. १२ जिल्हा परिषदांमध्ये एकूण ७३१ जिल्हा परिषद सदस्य निवडणूक दिले जाणार आहेत. या जिल्ह्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आलीय.

१२ जिल्हा परिषदांमधून ७३१ तर १२५ पंचायत समित्यांमधून १ हजार ४६२ सदस्य निवडले जाणार

दुबार मतदार आम्ही निश्चित केले असून त्याबाबतची कार्यवाही अधिकारी करतील. मताधिकार मोबाईल अॅपद्वारे मतदाराला त्याला त्याचा निवडणूक विभाग, मतदान केंद्र शोधता येईल. मतदाराला आयोगाच्या वेबसाईटवरही त्याचं नाव टाकून त्याचे मतदान केंद्र शोधता येईल. ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, गरोदर आणि तान्ह्या बाळासह असणाऱ्या स्त्रियांना मतदानावेळी प्राधान्य देण्यात येईल, १२ जिल्हा परिषदांमधून ७३१ सदस्य निवडून दिले जातील तर १२५ पंचायत समित्यांमधून १ हजार ४६२ सदस्य निवडून दिले जातील, असं राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

खालील जिल्हा परिषदांमध्ये होणार निवडणुक

पश्चिम महाराष्ट्र विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्हा परिषदा पार पडणार आहेत.

कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पार पडणार आहेत.

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्हा परिषदा पार पडणार आहेत.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts