Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • रात्रीचा अंधार अन् काळाने घाला घातला; नाशिकमध्ये कार विहिरीत पडून 9 जणांचा दुर्दैवी अंत
Top News

रात्रीचा अंधार अन् काळाने घाला घातला; नाशिकमध्ये कार विहिरीत पडून 9 जणांचा दुर्दैवी अंत

Nashik Accident News | नाशिकमध्ये (Nashik) मोठा भीषण अपघात (Accident) घडला आहे. एक भरधाव चारचाकी कार विहीरीत कोसळून भीषण अपघात घडला (Nashik Car Accident) आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा – CDR समोर? शिंदे-खरातचे १७ कॉल, चाकणकरांचे १७७ कॉल…

अपघात नेमका कसा घडला?

मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी शहरात शिवाजी नगर येथे राजू राजे यांच्या विहिरीत चारचाकी कार कोसळली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कारमध्ये 3 ते 4 लहान मुलांचा देखील समावेश होता, असा अंदाज वर्तवला जात आहे. कार अनियंत्रित झाल्यामुळे रस्त्याशेजारील विहिरीत ती कोसळून अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू

सुनील दरगोडे, त्यांच्या कुटुंबातील लोकं आणि इतर नातेवाईक एका कार्यक्रमातून घरी परत येत होते. मात्र, घरी परत येत असतानाच दरगोडे कुटुंबावर काळाने घाला घातला. वाटेतच चालकाचा गाडीवरील ताबा अचनाक सुटला आणि भरधाव वेगाने पळणारी कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत जाऊन कोसळली. विहीर पाण्याने भरलेली असल्यामुळे आणि रात्री खूप अंधार असल्यामुळे कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर येता आलं नाही आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने इंदोरे गावावर शोककळा पसरली आहे.

या भीषण अपघातनंतर स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनानं मदतीसाठी तातडीनं धाव घेतली होती. तर आता स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. या अपघातातील सर्वजण हे दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तर 9 मृतांपैकी पाच जणांची ओळख पटली आहे. यामध्ये राखी सुनील दरगोडे, सुनील दत्तू दरगोडे, उषा अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे आणि श्रद्धा अनिल दरगोडे अशी मृतांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले आहे. विहिरीत पडलेली ईरटीका कार अथक प्रयत्नांनंतर क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आलेली आहे. तर कारमधील नऊही जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून शोक व्यक्त केला जात आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts