Pankaja Munde | मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) या सध्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. त्यांनी राजकारण संपल्यानंतर काय करणार? याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचं नाव घेत पंकजा मुंडेंनी भावनिक आवाहन देखील केलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या सध्या चांगल्याच चर्चेत आल्या असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा – मध्यपूर्व तणावात भारताला मोठा दिलासा; LPG ने भरलेला ‘जग वसंत’ टँकर वडीनार बंदरात दाखल
पंकजा मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंबाबत केलं मोठं वक्तव्य
विधानसभा अधिवेशन झाल्यानंतर पंकजा मुंडे या बीड (Beed) दौऱ्यावर गेल्या आहेत. बीड जिल्ह्यातील भायाळा गावात नारळी सप्ताह आयोजित करण्यात आला होता. तर या नारळी सप्ताहामध्ये पंकजा मुडेंनी सहभाग घेतला होता. त्यांनी भायाळा गावात गणेशानंद गडाच्या नारळी सप्ताहाला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या भाविकांसोबत संवाद साधला.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, लोकसभेत पराभव झाल्यानंतर काही लोकांनी आत्महत्या केल्या. आपल्यावर या भावांनी इतकं प्रेम केलं होतं. तसेच संपूर्ण जगाला मी गोपीनाथ मुंडेंचं नाव विसरू देणार नाही, अशी शपथ मी चितेवर घेतली आहे. गोपीमाथ मुंडे या नावाच्या संस्कारावर किती विश्वास आहे, माझ्या कातड्याचे जोडे केले आणि ते तुमच्या पायात घातले तरी ही फेड होणार नाही, असं पंकजा मुंडे भावूक होत म्हणाल्या.
राजकारण संपल्यानंतर काय करणार पंकजा मुंडे?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? यावर पंकजा मुंडेंनी मोठं वक्तव्य केलं. राजकारण संपल्यानंतर मी देखील हरिभक्त पारायणाकडे जाणार आहे, असं मोठं आणि खळबळजनक वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांनी आदर्श राज्यकारभार केला त्याप्रमाणे परळीत देखील रामराज्य यावे, अशी माझी प्रभू चरणी प्रार्थना आहे. परळीतील काळाराम मंदिराला मोठी आध्यात्मिक आणि ऐतिहासिक परंपरा आहे. तसेच रामनवमीचा सण आपल्याला न्यायाच्या आणि सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, भायाळा गावात रामनवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तर दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पंकजा मुंडेंनी स्वत: पाळणा हलवून श्रीरामांना अभिवादन केले आणि त्यांच्याकडे प्रार्थना केली.












