Akshay Kumar | प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) मागील काही दिवसांपूर्वी चेक बाऊन्स प्रकरणामुळे अडचणीत आला होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर तिहार तुरूंगात शिक्षा भोगून राजपाल यादव जामिनावर बाहेर आला. राजपालने चित्रपट निर्मिती करण्यासाठी 5 कोटींचं कर्ज घेतलं होतं. मात्र, त्याचा चित्रपट फ्लॉप ठरल्यामुळे त्याला कर्ज फेडता आलं नाही. त्याने दिलेले सर्व चेक बाऊन्स झाले होते त्यामुळे त्याला तिहार तुरूंगात आत्मसमर्पण करावं लागलं होतं.
हेही वाचा – राजकारणात खळबळ! झिरवळांच्या व्हायरल व्हिडीओप्रकरणी पहिला FIR दाखल, थेट कारवाई कुणावर?
राजपालची बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मदत केली होती. यामध्ये अभिनेता सोनू सूद हा राजपाल यादवच्या मदतीला धावून आला होता. तर आता या प्रकरणावरून अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) राजपाल यादवला सुनावलं आहे.
अक्षय कुमारच्या आगामी ‘भूत बंगला’ या चित्रपटात राजपाल यादव हा महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. तर या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अक्षय कुमारने राजपाल यादवच्या चेक बाऊन्स प्रकरणावर भाष्य करत खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
राजपाल यादवबाबत नेमकं काय म्हणाला अक्षय कुमार?
अक्षय कुमारने राजपाल यादवला चित्रपट निर्मीती न करण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांने दिग्गज अभिनेते असरानी यांना आलेला एक अनुभव सांगितला. असरानी यांनी देखील त्यांच्या कठीण काळात चित्रपट निर्मिती केली होती. मात्र, त्यांना त्यात अपयश आल्याने ती त्यांची मोठी चूक असल्याचं त्यांनी अक्षयल सांगितलं होतं. याच अनुभवाच्या आधारावर अक्षयने राजपालला मोलाचा सल्ला दिला. अक्षय कुमार म्हणाला की, आपण अभिनेते आहोत आपलं हे काम नाही. चित्रपट निर्मात्यांचं काम खूप वेगळं असतं. त्यामुळे कधीही शॉर्टकटने पैसे कमावण्याचा प्रयत्न करू नये, असं म्हणच अक्षयने राजपालला मोलाचा सल्ला दिला.
दरम्यान, बऱ्याच वर्षांनंतर अक्षय कुमार आणि राजपाल यादव हे एकत्र काम करणार आहेत. भूत बंगला हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ते दोघं एकत्र येणार आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार, राजपाल यादवसह परेश रावल, वामिका गब्बी आणि तब्बू हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.












