Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरातचा (Ashok Kharat) खरा चेहरा आता समोर आला आहे. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खरातने अनेक भक्तांची आर्थिक फसवणूक देखील केल्याचं समोर आलं आहे. खरातच्या या काळ्या कारनाम्यांमुळे संपू्र्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. तर आताही खरातचा आणखी एक नवीन धक्कादायक प्रताप समोर आला आहे.
हेही वाचा – सर्वसामान्यांच्या खिशाला झळ! प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागलं; जाणून घ्या आजचे नवे दर
अशोक खरातने शाकाहारी भक्तांची कशी केली फसवणूक?
अशोक खरात हा आपल्या शाकाहारी असलेल्या भक्तांना प्रसाद म्हणून मांसाहार खायला भाग पाडत होता, असा धक्कादायक खुलासा झाला आहे. मासा ही एक पाण्यातील वनस्पती आहे. माश्याला रक्त आणि हाडे नसतात, असं सांगून भोंदू खरात अनेक शाकाहारी भक्तांना प्रसादाच्या नावाखाली मासे खाण्यास भाग पाडत असल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे.
खरातने अनेक जैन धर्मीय व्यावसायिकांना देखील अशाच प्रकारे फसवलं होतं. मासा कापल्यावर रक्त येत नाही आणि त्यात हाडे देखील नसतात, असा खोटा दावा करत तो लोंकाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता आणि त्यांना मासांहार खाण्यास भाग पाडत होता.
अशोक खरातने अनेक भक्तांनी आर्थिक फसवणूक देखील केली आहे. त्याने अनेक लोकांची लाखो रूपयांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलं आहे. खरातने अनेक व्यावसायिकांना देखील लाखोंचा गंडा घातला आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, आज खरातची पोलीस कोठडी संपली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यावेळी न्यायालयाने या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता खरातची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली जाणार आहे. अशोक खरातला आज न्यायाधीश श्रीमती बी इन ईचपुरानी यांच्या कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायधीशांनी काही कागदपत्रे तपासली आणि बाकी माहिती तपास अधिकाऱ्यांकडून घेतली. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांमध्ये अशोक खरातला न्यायाधीशांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खरातला ही शिक्षा पहिल्या गुन्ह्यासाठी देण्यात आली आहे.
उद्याही (2 एप्रिल) अशोक खरातला कोर्टात हजर केले जाणार आहे. दुसऱ्या गुन्ह्यासंदर्भात अशोक खरातला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्यामुळे उद्या त्याला कोणती शिक्षा मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











