Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • भक्तांसाठी खास संधी; गुढीपाडव्याला सिद्धिविनायक मंदिरात सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा लिलाव
Mumbai

भक्तांसाठी खास संधी; गुढीपाडव्याला सिद्धिविनायक मंदिरात सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा लिलाव

Siddhivinayak Temple | आज गुढीपाडवा (Gudi Padwa) असून हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या खास दिवशी मुंबईमध्ये (Mumbai) श्रद्धेचा आणि परंपरेचा एक अनोखा संगम पाहायला मिळाल. आज सकाळी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात (Siddhivinayak Temple) गणपती बाप्पाला अर्पण केलेल्या दागिन्यांचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावामध्ये भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

हेही वाचा – “चाकणकर पुरावे नष्ट करतील…”, अशोक खरात प्रकरणात रूपाली ठोंबरेंचा गंभीर आरोप, केला मोठा गौप्यस्फोट

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात दागिन्यांचा लिलाव

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात दागिन्यांचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलाव्यादरम्यान 234 प्रकारचे सोन्या-चांदीचे दागिने ठेवण्यात आले होते. यामध्ये लॉकेट, गणपती बाप्पााच्या पादुका, बांगड्या, सोन्या-चांदीची नाणी, साखळ्या अशा विशेष दागिन्यांसाचा समावेश होता. तर या दागिन्यांची किंमत अंदाजे 2 कोटी एवढी होती.

या लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी आणि बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. तर भाविक गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि शुभशकुन म्हणून हे दागिने खरेदी करत असतात. तर हे दागिने घरी आणल्यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी येते आणि बाप्पांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो, असा भाविकांचा विश्वास आहे. त्यामुळे या लिलावात भक्तांची मोठी गर्दी झाली होती.

सिद्धिविनायक मंदिर हे फक्त मुंबईतील भक्तांसाठीच नाही तर जगभरातील भक्तांसाठी श्रद्धेचे एक प्रमुख केंद्र आहे. तर या मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक बाप्पााच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने दागिन्यांच्या लिलावाचे आयोजन केले होते. या लिलावातून मिळणारा सर्व निधी हा शिक्षण, समाजकार्य आणि आरोग्य सेवांसाठी वापरला जातो.

दरम्यान, आज संपूर्ण महाराष्ट्रात गुढीपाडव्यानिमित्त आणि मराठी नवीन वर्षानिमित्त जल्लोषाचे वातावरण आहे. प्रत्येकाने आपल्या घरी परंपरेनुसार गुढी उभारली आहे. तर प्रत्येक ठिकाणी महिला पारंपरिक वेशात दिसत आहेत. डोंबिवलीत स्वागत यात्रेमध्ये पारंपारिक वेशात महिला रायडर्सने मोठा सहभाग घेतला आहे. तर संपूर्ण राज्यभरात ढोल-ताशांच्या गजरात नववर्षाचे स्वागत केले जात आहे.

गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे आज पंढरपूरमध्ये मोठी सजावट करण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठल रूक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराला देखील आकर्षक सजावट करण्यात आली असून तिथे परंपरेनुसार गुढीपाडवा साजरा करण्यात आला आहे. आज गुढीपाडव्यानिमित्त देवीची शिवकालीन दानिने घालुन अलंकार पुजा करण्यात आली असून पहाटे 4 वाजता देवीची आरती करण्यात आली.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts