Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • लग्नाचे आमिष, बलात्कार अन् गर्भपात…; कोर्टात झाला खरातचा पर्दाफाश, ऑनलाईन सुनावणीत नेमकं काय घडलं?
Top News

लग्नाचे आमिष, बलात्कार अन् गर्भपात…; कोर्टात झाला खरातचा पर्दाफाश, ऑनलाईन सुनावणीत नेमकं काय घडलं?

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. महिलांवर लैंगिक अत्याचार, लोकांची आर्थिक फसवणूक, जमीन हडपणे या प्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) अशोक खरातला अटक केली आहे. तर या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास विशेष तपास पथकाकडून (SIT) केला जात आहे. तसेच एसआयटीच्या तपासात दररोज नवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता अशोक खरातचा खरा चेहरा सर्वांसमोर आला असून तो चांगलाच अडचणीत सापडला आहे.

हेही वाचा – सर्वसामान्यांच्या खिशाला झळ! आंब्याचे दर गगनाला भिडले; पुणे आणि इतर जिल्ह्यांत काय आहेत भाव? जाणून घ्या

ऑनलाईन सुनावणीत नेमकं काय घडलं?

आज अशोक खरातला कोर्टात ऑनलाईन हजर करण्यात आलं होतं. खरातच्या जीवाला धोका असल्यामुळे एसआयटीने ऑनलाईन सुनावणी घेण्याची विनंती कोर्टाकडे केली होती. तर कोर्टाने देखील सुरक्षेच्या कारणास्तव ही विनंती मान्य केली. त्यामुळे आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अशोक खरातला कोर्टात हजर करण्यात आलं होतं.

ऑनलाईन सुनावणीदरम्यान तुम्हाला काही बोलायचं आहे का? असं न्यायायलाने अशोक खरातला प्रश्न विचारला. त्यावर खरातने हात जोडून मला काहीही बोलायचं नाही, असं म्हणत उत्तर दिलं. त्यानंतर न्यायालयात सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलामध्ये जोरदार युक्तीवाद झाला. यावेळी सरकारी वकील शैलेंद्र बागडे म्हणाले की, अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. तो मास्टरमाईंड आहे त्यामुळे तो तपासात सहकार्य करत नाहीये. त्यामुळे त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी बागडे यांनी केली.

पुढे ते म्हणाले की, अशोक खरातने अनेकवेळा पीडित महिलेवर बलात्कार केला आहे. त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले आहे. त्यानंतर त्यांने पीडितेला गर्भपात करण्यासाठी काही औषधं देखील दिली होती. तसेच पीडितेच्या आई वडिलांकडून आधार कार्ड त्याने घेतले होते. मग या आधार कार्डचा त्याने काशासाठी वापर केला? खरात महिलांना जे खारट पाणी प्यायला देत होता, त्यात तो नेमकं काय टाकत होता? तो गुंगीचं औषध महिलांना द्यायचा, ते कसलं औषध होतं? या सर्व गोष्टींचा तपास करणं गरजेचे आहे, त्यामुळे त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, असं शैलेंद्र बागडे म्हणाले.

अशोक खरात प्रकरणात अजून कोणी सहभागी होतं का? याबाबतची आम्हाला चौकशी करायची आहे. तसेच महिलांवर केलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांसंदर्भातही आम्हाला सखोल चौकशी करायची आहे, त्यामुळे खरातला पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी तपास अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी देखील केली आहे.

अशोक खरातच्या वकिलांनी काय केला युक्तीवाद?

दुसरीकडे अशोक खरातचा वकील सचिन भाटे यांनी युक्तीवाद केला. अशोक खरात यांना आधीच चौदा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. यावेळी त्यांनी बरेच खुलासे केलेले आहेत. तुम्ही गर्भपात झाले असं म्हणता मग त्याचा कालावधी काय होता? माझ्याकडे अजून एकाही गुन्ह्याची फिर्याद आलेली नाहीये. मला कोणतीही एफआयआर वाचायला मिळालेली नाहीये, असा युक्तीवाद सचिन भाटे यांनी केला.

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts