Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • ईदच्या दिवशी सार्वजनिक नमाज पठणावर बंदी; मुस्लिम देशाचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
Top News

ईदच्या दिवशी सार्वजनिक नमाज पठणावर बंदी; मुस्लिम देशाचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?

Ramadan Eid Namaaz | सध्या अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध (War) सुरू आहे. एकिकडे अमेरिका आणि इस्त्रायल इराणवर हल्ले करताना दिसत आहे तर दुसरीकडे इराण अनेक आखाती देशांवर हल्ले करत आहे. इराणने अमेरिकेचे तळ असलेल्या अनेक आखाती देशांवर ड्रोनने हल्ले (Drone Attack) केले आहेत. यामध्ये इराणने संयुक्त अरब अमिरातवरही (UAE) जोरदार हल्ले केले आहेत. यापार्श्वभूमीवर आता यूएईने ईद-उल-फितर संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – अध्यात्माच्या आड काळा कारनामा; धर्म-योगाच्या नावाखाली बनावट नोटांचे रॅकेट उघड, कोट्यवधींची रोकड जप्त

सार्वजनिक नमाज पठणावर का आणली बंदी?

इस्लाम धर्मातील पवित्र ईद-उल-फितर हा सण साजरा केला जाणार आहे. तर या पवित्र सणानिमित्त मुस्लिम बांधव खुल्या मैदानात नमाज पठण करत असतात. मात्र, यावर्षी यूएई सरकारकडून खुल्या मैदानात किंवा रस्त्यावर ईदची नमाज अदा न करण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. यंदा नमाज फक्त मशि‍दींमध्येच अदा करावी, अशी सूचना यूएई सरकारने जनतेला दिली आहे.

आखाती देशांमध्ये दरवर्षी ईद-उल-फितरची नमाज मोकळ्या मैदानात एकत्रितपणे अदा केली जाते. मात्र, यावेळी तसे होणार नसून मशि‍दींमध्ये जाऊन नमाज अदा करण्याचे आवाहन युएई प्रशासनाने जनतेला केले आहे, याबाबतची माहिती यूएईच्या जनरल अथॉरिटी ऑफ इस्लामिक अफेयर्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर यूएई सरकारने घेतला मोठा निर्णय

सध्या इराण आणि इस्त्रायल यांच्यातील तणाव चांगलाच वाढला आहे. इराण सतत यूएईवरही मिसाईल, ड्रोन हल्ले करत आहे. तर यूएईची एअर डिफेन्स इराणचे हे हल्ले रोखण्यात गुंतलेली असून त्यांनी अनेक ड्रोन हवेतच नष्ट केले आहेत. मात्र, ड्रोनचे अवशेष काही ठिकाणी पडल्यामुळे किरकोळ नुकसान झाले आहे. तर या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने यूएईने मशि‍दींमध्ये नमाज अदा करण्याच आवाहन जनतेला केले आहे.

इराणने यूएईमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करत क्षेपणास्त्र हल्ले केले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे दुबईतील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. इराणने दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरही मोठा हल्ला केला होता, ज्यात विमानतळाचे मोठे नुकसान झाले होते, तर काही लोक जखमी झाले होते. त्यामुळे आता ईदच्या निमित्ताने जनतेला सुरक्षित राहण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts