Induction Cooktop | सध्या अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. या तिन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारताला मोठा फटका बसला आहे. मध्य पूर्वेतील या युद्धामुळे भारतात गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. गॅस तुटवडा निर्माण झाल्यामुळे गॅसच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. तसेच लोकांना सिलिंडर बूक केल्यानंतर लवकर मिळतही नाहीयेत. त्यामुळे घरातील सिलिंडर संपल्यावर काय करायचं? असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. यापार्श्वभूमीवर आता लोकांनी गॅसला पर्याय म्हणून इंडक्शन (Induction) घेण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा – केस गळतीमुळे त्रस्त आहात? ‘हा’ घरगुती हेअर पॅक केसांना करेल मजबूत अन् दाट
इंडक्शन खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी?
बरेच लोक बाजारात जाण्यासाठी वेळ नसल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने इंडक्शन कुकटॉप ऑर्डर करत आहेत. पण ऑनलाइन कुकटॉप खरेदी करताना लोकं जास्त माहिती घेत नाहीत आणि थेट खरेदी करतात. त्यामुळे त्यांचे पैसे वाया जातातच सोबतच त्यांनी विकत घेतलेल्या वस्तू व्यवस्थित निघत नाहीत. आताही बरेच लोक कसलीही माहिती न घेता इंडक्शन खरेदी करताना दिसत आहेत. जर तुम्हीही ऑनलाइन पद्धतीने इंडक्शन खेरदी करायचा विचार करत असाल तर आधी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या ज्यामुळे तुमचे पैसे वाया जाणार नाहीत आणि तुमचा फायदा होईल.
इंडक्शन कुकटॉप हे विजेवर चालते त्यामुळे कधीही ते खरेदी करताना त्याच्या वीज वापराकडे लक्ष द्या. इंडक्शन हा सामान्यत:1200W ते 2000W पर्यंतच्या पॉवर रेंजमध्ये येतात. त्यामुळे जर तुम्हाला फक्त काही मोजकेच पदार्थ बनवायचे असतील म्हणजेच चहा, कॉफी असे काही पदार्थ बनवण्यासाठी घेत असाल तर कमी पॉवरचा इंडक्शन घ्या. तसेच जर तुम्हाला सगळा स्वयंपाकच बनवण्यासाठी घ्यायचा असेल तर 2000W पर्यंच इंडक्शन विकत घ्या.
जर तुम्ही कोणतीही माहिती न घेता इंडक्शन विकत घेतला तर मशीन काही दिवसांमध्ये गरम होणे, मशीनमध्ये बिघाड होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे नीट माहिती घेऊनच इंडक्शन खरेदी करा.
बरेल लोक इंडक्शन खरेदी करताना त्यांची भांडी विकत घेत नाहीत. आपल्या घरातील दररोजच्या वापरातील अॅल्युमिनियमची भांडी इंडक्शनवर वापरतात. त्यामुळे इंडक्शन एका महिन्याच्या आतच खराब होऊ शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्ही इंडक्शन खरेदी कराल तेव्हा इंडक्शन-फ्रेंडली भांडी खरेदी करा. यामुळे इंडक्शन खराब होण्याची कसलाही भीती निर्माण होत नाही.
कोणताही इंडक्शन खरेदी करताना तो कमी किंमत आहे म्हणून खरेदी करू नका. सर्वात आधी इंडक्शनचा ब्रँड, त्याची वॉरंटी तपासा. बऱ्याचदा स्वस्त आणि अज्ञात ब्रँडचे इंडक्शन लगेच खराब होतात. त्यामुळे किंमत जरी जास्त असली तरी चांगल्या कंपनीचे इंडक्शन खरेदी करा, यामध्ये तुम्हाला किमान 1 वर्षांची वॉरंटी मिळचे आणि इंडक्शन लवकर खराब होत नाही.












