Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • वांद्रे किल्ल्यावरील दारुपार्टीचा व्हिडिओ व्हायरल; ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती म्हणत शिवसेनेचा भाजपवर घणाघात 
Mumbai

वांद्रे किल्ल्यावरील दारुपार्टीचा व्हिडिओ व्हायरल; ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती म्हणत शिवसेनेचा भाजपवर घणाघात 

Drinking party at Bandra Fort : महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरू आहे, असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये मुंबईतील वांद्रे इथल्या किल्ल्यावर दारू पार्टी सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे किल्ल्यावरील या दारू पार्टीचे संयोजक ‘महाराष्ट्र पर्यटन’ विभाग असल्याचं त्यांनी म्हटलंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर ऐतिहासिक वास्तूवर दारूपार्टीला परवानगी मिळतेय कशी, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अखिल चित्रे यांनी महाराष्ट्र सरकार, राज्य उत्पादन शुल्क विभाग, तसेच मुंबई महानगरपालिकेवर थेट निशाणा साधत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. तर राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून सुरुवात करायची आणि बोभाटा झाला नाही तर ह्याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे हेच भाजपा आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती असल्याचा घणाघात देखील त्यांनी केलाय.

हेही वाचा – NDA च्या प्रचंड बहुमतानंतर कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? नितीश कुमारांची भेट घेतल्यानंतर चिराग पासवान यांची सावध प्रतिक्रिया

अखिल चित्रे यांची पोस्ट-

महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या आणि नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महानगरपालिका परवानगी देतंच कसं? आणि किल्ल्यावरील या दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर ‘महाराष्ट्र पर्यटन’ विभाग? नक्की काय सुरु आहे? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे सो कॉल्ड ‘सांस्कृतिक मंत्री’ आशिष कुरेशी’ असा सवाल चित्रे यांनी केला आहे. सुरुवात राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून करायची आणि बोभाटा झाला नाही तर याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे, हेच भाजपा आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती,’ अशी टीका त्यांनी केली आहे. 

पवित्र स्थळाचं पावित्र्य घालवण्याचं पाप

“किल्ल्यावर दारुपार्टी आणि त्याला परवानगी, हे तर अती झालंय. ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं, हा त्यामागचा उद्देश दिसतोय. तुम्ही परवानगी देताच कशी? ज्या अधिकाऱ्यांनी या दारुपार्टीला परवानगी दिली, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. उत्पादन शुल्क विभागाने लाच घेऊन ही परवानगी दिली आहे. पवित्र स्थळाचं पावित्र्य घालवण्याचं पाप त्यांनी केलं”, असा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी होत असतील तर कारवाई होईल, असं अमित साटम यांनी स्पष्ट केलं.

इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांची नाराजी

दरम्यान ही घटना 16 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीची असून स्थानिक रहिवाशांनीच व्हिडिओ शूट केल्याची माहिती अखिल चित्रे यांनी दिली आहे. या प्रकरणावर इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून आता राज्य सरकार यावर काय उत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts