Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • युद्धबंदीनंतर मोठा दिलासा? कच्च्या तेलाच्या दरात घसरण, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
Top News

युद्धबंदीनंतर मोठा दिलासा? कच्च्या तेलाच्या दरात घसरण, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Petrol-Diesel Prices Drop | अमेरिका (US) आणि इराणने (Iran) युद्धविरामाची घोषणा केली आहे. यामुळे संपूर्ण जगाला मोठा दिलासा मिळाला आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे अनेक देशांना महागाईचा फटका बसला होता. यामध्ये भारताला देखील महागाईची झळ बसली होती. भारतात पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel) आणि एलपीजी गॅसच्या (LPG Gas) किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली होती. अशातच आता लवकरच पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Prices) कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – युद्ध थांबलं पण तणाव कायम? इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मोठा आदेश, म्हणाले, “या युद्धाचा अतं नाही…”

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट

अमेरिका आणि इराणने युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे लवकरच पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाली असून त्यांचे दर 15 टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. तर ब्रेंट क्रूडची किंमती ही प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली घसरली असल्याची माहिती समोर आली आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक आता सुरळीत झाली आहे. तर जगाच्या एकूण खनिज तेल पुरवठ्यापैकी 20 टक्के वाटा हा होर्मुझ सामुद्रधुनीतून होत असतो. त्यामुळे आता युद्धविरामामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक सुरळीत झाली असून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट झाली आहे. आज मुंबई, पुणे आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, कच्च्या तेलाचे दर 95 डॉलर्सच्या खाली टिकून राहिले तर तेल कंपन्या लवकरच दर कपातीची घोषणा करू शकतात.

कच्च्या तेलाच्या किमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी घसरण झाली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीतील घसरणीचा परिणाम हा देशांतर्गत पेट्रोल पंपांवर दिसण्यासाठी साधारणपणे 7 ते 10 दिवस लागतात. त्यामुळे सात ते दहा दिवसांनंतर पेट्रोल-डिझेलचे दर कमी होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, सर्वसामान्यांसाठी सरकारी तेल कंपन्या लवकरच दरकपातीची घोषणा करू शकतात, अशी माहितीही समोर येत आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts