Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • अशोक खरातला पुन्हा झटका; 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढली, कोर्टात नेमकं काय घडलं?
Top News

अशोक खरातला पुन्हा झटका; 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढली, कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून निघाला आहे. अशोक खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे अशोक खरातला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. आत्तापर्यंत अशोक खरातविरोधात 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये 2 जणांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आणि 8 महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अजूनही गुन्हे खरातवर दाखल होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून (SIT) केला जात आहे.

हेही वाचा – अशोक खरातला अमित शाहांपर्यंत कोणी पोहोचवलं? बड्या नेत्यांची नावं घेत संजय राऊतांचे गंभीर आरोप

न्यायालयात नेमकं काय घडलं?

आज अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. तर न्यायालयाने भोंदूबाबा अशोक खरातच्या पोलीस कोठडीत 3 दिवसांची वाढ केली आहे. नाशिक कोर्टात न्यायमूर्ती एम.व्ही.भराडे यांनी अशोक खरातची 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली आहे. त्यामुळे आता खरातला पुन्हा एकदा 1 एप्रिलला कोर्टात हजर राहावं लागणार आहे.

अशोक खरात प्रकरणाचा अधिक तपास करण्यासठी एसआयटीने आणखी वेळ मागितला आहे. एसआयटीने कोर्टात सांगितले की, आरोपी अशोक खरात तपासात सहकार्य करत नाहीये. त्याचा मोबाईल डेटा रिकव्हर झाला असून अधिक तपास बाकी आहे. त्याच्या फोनमध्ये अनेक राजकीय नेत्यांची नावे ही दुसऱ्या नावाने सेव्ह असल्याचा संशय आहे. तसेच खरातविरोधात पीडित महिलांनी केलेले आरोप अतिशय गंभीर आहे, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात दिली.

कोर्टात सरकारी वकिलांनी सांगितलं की, आरोपी खरात हा तपासात सहकार्य करत नाहीये. तो मास्टरमाईंड आहे. तो पीडित महिलांना जे पाणी द्यायचा त्यात तो काय टाकायचा? हे सांगत नाहीये. तसेच त्याच्याकडे जंगम मालमत्ता आहे, याबाबतही तपास करायचा आहे. दररोज पीडित महिला तक्रारी घेऊन येत आहेत. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती वाढू शकते. त्याने अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे त्याला आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी विनंती सरकारी वकिलांनी केली आहे. त्यामुळे आता कोर्टाने खरातच्या पोलीस कोठडीत वाढ केली असून त्याच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts