• Home
  • मनोरंजन
  • सिनेविश्वातील दिग्गज हरपला! प्रसिद्ध दिग्दर्शक बॅरी कॅल्डवेल काळाच्या पडद्याआड, 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Top News

सिनेविश्वातील दिग्गज हरपला! प्रसिद्ध दिग्दर्शक बॅरी कॅल्डवेल काळाच्या पडद्याआड, 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

director

Director Barry Caldwell Passes Away | हॉलिवूडमधील (Hollywood) अॅनिमेशन क्षेत्रातील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अॅनिमेटर बॅरी कॅल्डवेल (Director Barry Caldwell) यांचं निधन झालं आहे. बॅरी कॅल्डवेल यांनी वयाच्या 68 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं संपूर्ण मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. तसेच बॅरी कॅल्डवेल यांच्या निधानानं हॉलिवूडमधील अॅनिमेशन (Animation) क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.

हेही वाचा – ‘धुरंधर 2’चा बॉक्स ऑफिसवर धडाका; 9 वर्षांचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास, ‘बाहुबली’च्या निर्मात्यानं केलं कौतुक

बॅरी कॅल्डवेल यांच्या निधनानं अॅनिमेशन क्षेत्राचं मोठं नुकसान

बॅरी कॅल्डवेल यांनी ‘पिंकी अँड द ब्रेन’ आणि ‘अॅनिमानियाक्स’ यासारख्या लोकप्रिय सिरीजची निर्मिती केली होती. बॅरी कॅल्डवेल यांनी School Of Visual Arts येथे शिक्षण पूर्ण केले. तर त्यांनी 1980 साली फॅट अल्बर्ट आणि कॉस्बी किड्स या सिरीजमधून अॅनिमेशन क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी ड्रिमवर्क्स अॅनिमेशन, ब्रदर्स अॅनिमेशन आणि वॉल्ट डिस्ने टेलिव्हिजन अॅनिमेशन यांसारख्या नामांकित स्टुडिओंसोबत काम करत आपली अनोखी ओळख निर्माण केली होती.

बॅरी कॅल्डवेल यांनी आत्तापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांची निर्मिती करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामध्ये द टॉम अँड जेरी, चिप एन डेल रेस्क्यू रेंजर्स, द स्पर्फ्स, ही-मॅन अँड द मास्टर्स ऑफ द युनिव्हर्स यांसारख्या गाजलेल्या मालिंकांची निर्मिती बॅरी कॅल्डवेल यांनी केली होती. यासोबतच त्यांनी द टायगर मुव्ही, किम पॉसिबल, टायनी टून अॅडव्हेंचर्स यांसारख्या चित्रपटांच्या निर्मितीमध्येही त्यांनी मोठं योगदान दिलं होतं.

बॅरी कॅल्डवेल यांच्या निधनानं अॅनिमेशन क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांनी आणि अनेक कलाकारांनी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली आहे. यामध्ये पॉल दिनी यांनी फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर करत बॅरी कॅल्डवेल यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. “करिअरच्या सुरूवातीलाच माझी बॅरी कॅल्डवेल यांच्यासोबत ओळख झाली होती. कॅल्डवेल हे फक्त उत्कृष्ट व्यंगचित्रकारच नव्हते तर ते एक प्रतिभावन दिग्दर्शकही होते. अॅनिमेशन इंडस्ट्रीमध्ये त्यांचा मोठा सन्मान होता. तर बॅरी कॅल्डवेल यांच्या निधनानं कधी न भरणारे मोठे नुकसान झाले आहे, असं पॉल दिनी यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts