• Home
  • लाईफस्टाईल
  • रोज वर्कआउटची सवय लावायची आहे? फिटनेस ट्रेनरच्या या 3 सोप्या ट्रिक्स करून पाहा
लाईफस्टाईल

रोज वर्कआउटची सवय लावायची आहे? फिटनेस ट्रेनरच्या या 3 सोप्या ट्रिक्स करून पाहा

workout

Workout Habit: तुम्हालाही फिट राहायचंय पण कंसिस्टन्सी नाही? अशा वेळी अनेकांना काय करावं कळत नाही. मग या ट्रेनरच्या काही सोप्या टिप्स फॉलो करा आणि स्वतःमध्ये बदल पाहा.

आजच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकजण फिट राहण्याकडे विशेष लक्ष देत आहेत. काही लोक आरोग्यदायी आहार सुरू करतात, तर काहींना जिममध्ये जायला आवडते. अनेकांसाठी दररोज व्यायाम करणे हे एक मोठे आव्हान असते. कधी वेळेच्या अभावामुळे, कधी आळसामुळे तर कधी इतर कारणांमुळे नियमितता राखली जात नाही. यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.

हेही वाचा: साधूच्या वेशात रस्त्यावर महिलांना नको तिथे स्पर्श; VIDEO पाहून थक्क व्हाल

तज्ञांच्या मते, फिटनेस हा एक दिवसाचा प्रयत्न नसून ती एक जीवनशैली आहे, जी हळूहळू अंगीकारावी लागते. छोटे बदल केल्याने आणि मानसिक तयारी ठेवल्याने दररोज व्यायाम करणे सोपे आणि आनंददायक होऊ शकते.

रोज व्यायामासाठी लक्षात ठेवा या ३ गोष्टी

छोट्यापासून सुरुवात करा

एकदम जास्त वेळ किंवा कठीण व्यायाम करण्यापेक्षा सुरुवातीला 10-15 मिनिटांचा साधा व्यायाम करा. हळूहळू वेळ आणि तीव्रता वाढवा. यामुळे सवय टिकवणे सोपे जाते.

योग्य वेळी व्यायाम करा

दररोज एकाच वेळी व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. सकाळी किंवा संध्याकाळी, जेव्हा तुम्हाला सोयीस्कर वाटेल तेव्हा वेळ निश्चित करा. यामुळे शरीर आपोआप त्या वेळेसाठी तयार होते.

स्वतःला प्रेरित ठेवा

व्यायाम करताना संगीत ऐका, मित्राला सोबत घ्या किंवा छोटी छोटी ध्येये ठेवा. प्रत्येक ध्येय पूर्ण झाल्यावर स्वतःला बक्षीस द्या. यामुळे उत्साह टिकून राहतो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts