Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • फिट आणि हेल्दी रहायचंय? मग ‘हे’ ड्रायफ्रुट्स रोज खायला चालू करा, लगेच दिसेल फरक
लाईफस्टाईल

फिट आणि हेल्दी रहायचंय? मग ‘हे’ ड्रायफ्रुट्स रोज खायला चालू करा, लगेच दिसेल फरक

dryfruits

Dry Fruits Benefits: आजच्या धावपळीच्या जीवनात वर्कआऊटसाठी वेळ नाही का? काळजी करू नका! फक्त रोज ड्रायफ्रुट्स खावा आणि फिट व हेल्दी राहा.

फिट आणि हेल्दी राहायचंय? तर तुमच्या डाएटमध्ये हे ड्रायफ्रुट्स नक्की समाविष्ट करा! बदाम, अक्रोड, काजू आणि विविध बीज फक्त चविष्ट नाहीत, तर हे तुमच्या शरीराला व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर आणि हेल्दी फॅट्स देतात. रोज काही प्रमाणात खाल्याने ऊर्जा वाढते, मेंदू ताजेतवाने राहतो आणि शरीराला पोषण मिळते. हे ड्रायफ्रुट्स तुमच्या डाएटचा छोटा पण पॉवरफुल भाग ठरतात आणि काही आठवड्यांतच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल.

हेही वाचा: iPhone युजर्स खुशखबर! व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ‘या’ 6 दमदार फीचर्सची एन्ट्री; पाहा कसं वापरायचं

किती प्रमाणात खावे?

बदाम: रोज ५ ते ७ बदाम पुरेसे आहेत. हे व्हिटॅमिन E आणि मॅग्नेशियम देतात.
अक्रोड: रोज २ अक्रोड पुरेसे आहेत. यात ओमेगा-३ असतो जो मेंदूसाठी फायदेशीर आहे.
बीज: नियमित रोज १ चमचा पुरेसा आहे. फायबर आणि हेल्दी फॅट्स मिळतात.

कोणते ड्रायफ्रुट्स जास्त खाऊ नये?

मनुके: साखरेचे प्रमाण जास्त असते, जास्त खाल्ले तर रक्तातील साखर वाढू शकते.

काजू: खूप जास्त खाल्ले तर फॅटमुळे वजन वाढू शकते.

खजूर: एक खजूर जवळजवळ 16 ग्रॅम साखर देते. त्वरीत ऊर्जा मिळते, पण जास्त खाल्ले तर ओवरडोज होऊ शकते.
सावधगिरी

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts