Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • ग्रामीण भागात मधमाशांची घट, फळबागांच्या उत्पादनावर परिणाम, शेतकरी अडचणीत 
Top News

ग्रामीण भागात मधमाशांची घट, फळबागांच्या उत्पादनावर परिणाम, शेतकरी अडचणीत 

Decline in Honeybees Impacts Orchards

Decline in bees impact on farmers : एककाळी झाडीझुडपात दिसणाऱ्या मधमाशा आता दिसेनाच्या झाल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये मधमाशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याचे चित्र समोर येत आहे. याचा थेट परिणाम फळबागांच्या उत्पादनावर होत असून शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

मधमाशा परागीकरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या

एकीकडे शेतीमध्ये वाढत्या प्रमाणात कीटकनाशकांचा प्रदुर्भाव, तर दुसरीकडे पर्यावरणातील बदल या दुहेरी फटक्यामुळे मधमाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मधमाशा परागीकरणासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याने त्यांच्या कमतरतेचा परिणाम थेट फळबागांवर दिसून येत आहे.

फळपिकांच्या उत्पादनात घट

फुलांवर बसून परागीकरण करणाऱ्या मधमाशा कीटकनाशकांच्या संपर्कात येताच मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे आंबा, डाळिंब, मोसंबी , लिंबू ,यांसारख्या फळपिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. तर काही शेतकऱ्यांना आता कृत्रिम पद्धतीने मधमाशांचे पालन करावे लागत आहे, किंवा बाहेरून मधमाशांच्या पेट्या आणून परागीकरणासाठी वापर करावा लागत आहे. यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.

कृत्रिम मधमाशांचा आधार

कीटकनाशकांमुळे मधमाशा मरत आहेत. त्यामुळे उत्पादन कमी होत आहे. आम्हाला आता कृत्रिम मधमाशांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे खर्चांमध्ये देखील मोठी भर पडत आहे त्याचबरोबर ज्या मतपेट्या आयात केल्या जातात त्या मदपेटांमधील माशा परगगीकरण करत नाहीत त्यामुळे उत्पन्नामध्ये मोठी घट होत असते,

पर्यावरणपूरक उपाययोजना आवश्यक

‘मधमाशा शेतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यांचे संवर्धन करण्यासाठी कीटकनाशकांचा नियंत्रित वापर आणि पर्यावरणपूरक उपाययोजना आवश्यक आहेत. फुलाचे झाडांचा उपयोग करावे बांधावर जास्तीत जास्त लागवड करावी, मधमाशांना आकर्षित करशील अशा पद्धतीच्या फुलांच्या झाडांची बांधावर लागवड करावी’, असे आवाहन प्रगतशील शेतकरी राम महाराज जाधव यांनी केले आहे.

फळबागा व भाजीपाला पिकांच्या उत्पादनावर परिणाम

मधमाशांची संख्या झपाट्याने घटत असून नैसर्गिक ‘मोहोळ’ सापडणे दुर्मिळ झाले आहे. यामुळे फळबागा व भाजीपाला पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत असून शेतकरी चिंतेत आहेत. कीटकनाशकांचा वाढता वापर, हवामान बदल आणि झाडांची घटती संख्या यामुळे मधमाशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परिणामी आंबा, डाळिंब यांसारख्या पिकांमध्ये फळधारणा कमी होत आहे.

मधमाशांचे संवर्धन आणि संगोपनासाठी शासनाने ठोस धोरण राबवावे

अनेक शेतकऱ्यांना कृत्रिम परागीकरणाचा आधार घ्यावा लागत असून उत्पादन खर्च वाढला आहे. मधमाशांचे संवर्धन आणि संगोपन करण्यासाठी शासनाने ठोस धोरण राबवावे, अशी मागणी आता जोर धरू लागलीय.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts