Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • “जहाज घेऊन जायचंय तर आमच्या नौदलाशी…”, होर्मुझ सामुद्रधुनीबाबत इराणची मोठी घोषणा
Top News

“जहाज घेऊन जायचंय तर आमच्या नौदलाशी…”, होर्मुझ सामुद्रधुनीबाबत इराणची मोठी घोषणा

Hormuz Strait Oil Tanker | अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) यांच्यातील युद्ध (War) चांगलंच पेटले आहे. या युद्धामुळे इराणने स्ट्रेट होर्मुझ जलमार्गाला (Hormuz Strait) टार्गेट करत तेथून जाणाऱ्या जहाजांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे अनेक देशांची जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीत अडकून पडली आहेत. यामुळे संपूर्ण जगभरात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

हेही वाचा – अमेरिकेला मोठा धक्का! युद्ध सुरू असताना KC-135 रिफ्युलिंग विमान क्रॅश, 5 जणांचा मृत्यू

दोन दिवसांपूर्वी भारताने इराणशी संवाद साधत होर्मुझ सामुद्रधुनीतून आपल्या जहाजाला सोडण्याची विनंती केली होती. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरग यांच्यासोबत चर्चा केली होती. या दोन्ही मंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय ध्वज असलेले तेलाचे टँकर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलेल्या मध्यस्थीमुळे भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. यापार्श्वभूमीवर आता इराणने मोठी घोषणा केली आहे.

इराणने नेमकी काय घोषणा केली?

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतून ज्या देशांच्या जहाजांना पुढे जायचे आहे त्यांनी आधी इराणी नौदलाशी समन्वय साधावा, अशी घोषणा इराणने केली आहे.

ज्या जहाजांना पुढे जायचे आहे त्यांनी इराणी नौदलाशी संपर्क साधावा. नौदलाशी चर्चा केल्यानंतर तुम्ही तुमचे तेल आणि गॅस टँकर जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतून घेऊन जाऊ शकता. अमेरिका आणि इस्त्रायल या देशांचे जहाज वगळता अन्य देश आपले जहाज पुढे घेऊन जाऊ शकतात. मात्र, जे देश अमेरिकेला आणि इस्त्रायलला पाठिंबा देत आहेत अशा देशांना परवानगी नाकारली जाईल, असं इराणच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

काही देशांनी आमच्यासोबतच चर्चा केली आहे आणि आम्ही त्यांना सहकार्य केले असून त्यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतून आपले जहाज पुढे नेले आहेत, अशी माहितीही इराणच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांनी दिली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून कोणत्याही देशाचे तेल वाहू जहाज जाऊ देणार नसल्याचा इशारा दिला होता. यामध्ये भारताचे देखील तेलाचे टँकर्स अडकले होते. मात्र, एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरग यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर भारताचे तेलाचे टँकर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या होर्मुझ सामुद्रधुनीतून भारताचे दोन तेल वाहून नेणारी पुषक्र आणि परिमल ही जहाजे सुरक्षितरित्या पास झाली आहेत. तर आता या सामुद्रधुनीमध्ये इस्त्रायल, अमेरिका आणि युरोप या देशांचे तेल वाहू टँकर्स अडकले आहेत. इराणने दिलेल्या इशाऱ्यामुळे या तिन्ही देशांचे टँकर्स पास होण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत.

 

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts