Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • पाकिस्तानच्या तोंडचे पळाले पाणी; सिंधू जल करारावरून भारताने फटकारलं
Top News

पाकिस्तानच्या तोंडचे पळाले पाणी; सिंधू जल करारावरून भारताने फटकारलं

sindhu-jal karar

Indus Water Treaty : दहशतवादी कारवायाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानमध्ये (bharat-pakistan) तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे भारताने अनेकदा पाकिस्तानला झापले आहे. परंतु पाकिस्तान दहशतवादी कारवाया (Terrorist Activities)  थांबवत नाही. त्यातच पाकिस्तानने सिंधू जल कराराबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवर (युनोमध्ये) (united nation organistion) भारतावर दबाव टाकण्याचे काम करण्यात आले. यावर जोपर्यत दहशतवादाचे जागतिक केंद्र असलेला पााकिस्तान आपली भूमिका बदल नाही, तोपर्यत सिधू जल करार निलंबितच राहिल. म्हणजेच थोडक्यात काय तर भारत कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला पाणी देणार नाही. भारताने घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे पाकिस्तानच्या तोंडचे पळाले पाणी पळाले आहे.

हे ही वाचा: युद्धाचा झळा; महागाईने कंबरडे मोडणार?

जागतिक मंचावर पाकिस्तानला तोंडावर पाडले

जागतिक जल दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांमध्ये एक कार्यक्रम पर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी भारताचे प्रतिनिधी म्हणून तिथे पी. हरीश पोहोचले होते. यावेळी पाकिस्तानकडून जल सिधू करारचा मुद्दा उपस्थित करताच हरिश यांनी चांगले फटकारले. यावेळी हरिश यांनी म्हटले की, करारांचे पालक करण्यावर बोलण्यापूर्वी पाकिस्तानने मानवी जीवनाच्या पावित्र्याचा आदर केला पाहिजे. भारताने जागतिक मंचावर पाकिस्तानला तोंडावर पाडले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे पडसाद

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने पहलगाम येथे हल्ला केला. त्यात अनेक पर्यटकाना ठार मारण्यात आले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे अनेक व्हिडीओही पुढे आले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात मोठा संताप बघायला मिळाला. कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली जात होती. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानात घुसून थेट मोठा हल्ला केला आणि दहशतवाद्यांचे अड्डे उद्ववस्थ केले.

पाकिस्तानच्या आवाहनकडे दुर्लक्ष

पहलगाम दहशतवादी हल्ल्याने भारत सरकारने पाकिस्तानचे पाणी रोखले. परंतु आता पाकिस्तान आता पाण्यासाठी तरसु लागला आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून सिंधू जल कराराची अंमल बजावणी करावी अशी मागणी करण्यात आली. परंतु भारताने सिंधू जल करार रद्द केल्यापासून पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानकडून वारंवार सिंधू जल करार लागू करण्याचे आवाहन केले जात आहे.

तोपर्यंत पाकिस्तानला पाणी नाही

दरम्यान, युनोच्या बैठकीत पाकिस्तानने सिंधू-जल कराराचा निलंबनाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी भारताने पाकिस्तानला न जुमानता त्या मुद्दयाकडे दुर्लक्ष केले. यावर आपली भूमिका मांडताना भारताने जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानला पाणी दिले जाणार नाही. एवढेच नाही तर सिंधू-जल करार निलंबित राहील, अशा शब्दात भारताने पाकिस्तानला बजवाले. त्यामुळे पाकिस्तानच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts