Israel Attack On Iran Tehran Oil Refinery | अमेरिका (America), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या तिन्ही देशांमधीयल युद्ध (War) थांबण्यांचं नाव काही घेत नाहीये. दिवसेंदिवस या तिन्ही देशांमधील युद्ध वाढतच चालले आहे. एकिकडे अमेरिका, इस्त्रायलकडून इराण देशावर जोरदार हल्ले केले जात आहेत. तर दुसरीकडे इराणकडूनही प्रतिहार केला जात आहे. यामुळे हे युद्ध चांगलंच पेटलं आहे. अशातच आता इस्त्रायलने इराणवर हल्ले करण्यास सुरूवात केली आहे. इस्त्रायलने इराणचे तेल प्रकल्प उद्ध्वस्त केले आहेत.
हेही वाचा – ‘AI चेटकीण’ श्रीराम जन्मभूमी येथील स्वामी गोविंददेव गिरी महाराज हे काय बोलून गेले..
हल्ल्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेला इशारा
काल (7 मार्च) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सांगितले होते की, आजची रात्र ही इराण देशासाठी सर्वात वाईट रात्र असले. ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर काही तासांमध्येच इस्त्रायलने इराणवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात इराणच्या तेहराणमधील तेल शुद्धीकरण प्रकल्पाला लक्ष्य करण्यात आले होते. इराणचे सर्व तेल प्रकल्प आगीत उद्ध्वस्त झाले असून मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्याचे काही व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
इस्त्रायने तेहरानमधील तेल प्रकल्पावर हल्ले केले होते. या हल्ल्यांनंतर तेहरानमध्ये आगीचा भडका उडाला होता. तर तेहरानमधील हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे. या हल्ल्यानंतर इराण आणखी संतप्त झाला असून इराणनेही इस्त्रायवर प्रतिहार केला आहे.
हल्ल्यानंतर इराणने घेतला बदला
या हल्ल्याबाबत इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी इस्त्रायलमधील हैफा येथील एका रिफायनरी प्रकल्पावर हल्ला केला आहे. तेहरानमधील तेल प्रकल्पावर केलेल्या हल्ल्याचा हा बदला असल्याचं इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने म्हटलं आहे.
दरम्यान, इराण सध्या अत्यंत वाईट परिस्थितून जात आहे. आधी त्यांचे दोन सर्वोच्च नेते ठार करण्यात आले, तर आता त्यांच्या युद्धनौका उद्धवस्त करण्यात आल्या आहेत. तसेच इराणमधील शाळा, सरकारी इमारतींवरही अमेरिका, इस्त्रायलकडून हल्ला केला जात आहे. यामध्ये इराणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कोणताही देश त्यांच्यासोबत उभा राहिलेला नाहीये. त्यामुळे इराण स्वबळावर लढताना दिसत आहे.
अमेरिकेने इराणी युद्धनौकेला श्रीलंकेच्या हद्दीत लक्ष्य करत उद्ध्वस्त केले आहे. जेव्हा अमेरिकेने इराणी युद्धनौकेवर हल्ला केला तेव्हा जहाजावर 180 सैनिक होते. तर या हल्ल्यात 87 सैनिकांचा मृत्यू झाला असून इतर सैनिकांचा शोध सुरू आहे.











