Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • मतदारांची पार लायकीच काढली! “मटण खा त्यांचं, पण बटण दाबा आमचं”; मंत्र्याचं खळबळजनक विधान
Top News

मतदारांची पार लायकीच काढली! “मटण खा त्यांचं, पण बटण दाबा आमचं”; मंत्र्याचं खळबळजनक विधान

Minister Gulabrao Patil

सध्या राज्यात २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकींचा प्रचार शि‍गेला पोहोचला आहे. नेते एकमेकांवार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तर काही नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासनाच्या खैरात वाटत आहेत. असं सर्व एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला मात्र, मंत्री गुलाबराव पाटील यांनी पार मतदारांची लायकीच काढली आहे. “मटण खा त्यांचं, पण बटना दाबा आमचं” असं म्हणत त्यांनी एकच खळबळ उडवून देणार विधान केलं आहे.

राज्यात नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचाराला वेग आला असताना सर्वच पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध मार्ग वापरताना दिसत आहेत. अशातच शिवसेना नेते व राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या एका विधानाने राज्यभरात मोठी चर्चा रंगली आहे. नाशिकमधील भगूरयेथे झालेल्या सभेत त्यांनी मतदारांना “मटण खा त्यांचं, पण बटण दाबा आमचं” असा सल्ला देत विरोधकांवर हल्लाबोल केला.

उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गडगडाटात दाद दिली

निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना अनेक ठिकाणी भोजनाचे, मटणाचे आयोजन केले जाते, यावर भाष्य करताना पाटील यांनी विरोधकांकडे पैसा जास्त असला तरी जनता काम बघून मतदान करेल असे सांगितले. त्यांच्या या हटके विधानाची सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गडगडाटात दाद दिली असून आता हे वक्तव्य सोशल मीडियावरही वेगाने चर्चेत आहे.

हेही वाचा – ‘सत्याचा मोर्चा’त सत्य! एकट्या मुंबईत ११ लाख दुबार मतदार, आयोगाकडून शिक्कामोर्तब

पूर्वी बायको नवऱ्याकडे पैसे मागायची, आता नवरा बायकोकडे पैसे मागतो

भगूरमधील सभेत बोलताना पाटील म्हणाले की, “ही निवडणूक शहर विकासाची आहे. विरोधक कितीही एकत्र आले तरी जनत कामाला आणि प्रतिमेला मत देते.” त्यांनी भगूर नगरपालिका क्षेत्रात झालेल्या विकासकामांचा उल्लेख करत करंजकरांच्या कामगिरीचे कौतुक केले. पूर्वी बायको नवऱ्याकडे पैसे मागायची, आता नवरा बायकोकडे पैसे मागतो. अर्ध्या रात्री रक्त देणारे लोक आम्ही उभे केलेत. अशांना साथ द्या.” या विधानातून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या सामाजिक भूमिकेवरही प्रकाश टाकला.

“ते मटण देतील, मटण त्यांचे खा… पण बटण आमचं दाबा

यानंतर त्यांच्या सभेत काही वेगळे मुद्देही पुढे आले. निवडणूक जवळ आली की मतदारांवर विविध प्रकारचे प्रलोभन टाकले जातात, त्यावर पाटील म्हणाले की, “ते मटण देतील, मटण त्यांचे खा… पण बटण आमचं दाबा.” या विधानामुळे सभागृहात एकच हास्या पिकला.

img

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts