• Home
  • देश
  • इराण-इस्राईल-अमेरिका युद्ध लवकर संपावे : नरेंद्र मोदी
Top News

इराण-इस्राईल-अमेरिका युद्ध लवकर संपावे : नरेंद्र मोदी

pm modi

narendra modi :  इराण आणि अमेरिकेतील युद्धामुळे भारतालाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे इराण-इस्राईल युद्ध लवकर संपले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच प्रत्येक भारतीयाचं संरक्षण  (Protection of Indians) हेच आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. तसेच युद्धाने होरपळलेल्या देशातील भारतीयांना आम्ही सातत्याने मदत करत आहोत, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (prime minister narendra modi) यांनी देशाला संबोधित करताना सांगितले.

हे ही वाचा: पैशांसाठी सारे काही..! भारतीय वायुसेनेच्या कर्मचाऱ्याची पाकिस्तानसाठी हेरगिरी

एक कोटींपेक्षा जास्त भारतीय लोक आखाती देशांमध्ये

युद्धामुळे देशात अनेक संकट निर्माण झाले आहेत. हे संकट मानवीय, आर्थिक आणि सुरक्षेबाबत आहे. युद्धात सहभागी असलेल्या देशांसोबत भारताचे व्यापारी संबंध आहेत. ज्या भागात युद्ध आहे तिथून भारताला मोठ्या प्रमाणात कच्चे तेल मिळते. एक कोटींपेक्षा जास्त भारतीय लोक आखाती देशांमध्ये राहत आहेत. आम्ही हा संघर्ष संपवण्याचे आवाहन करत आहोत, असे मोदी यांनी सांगितले.

युद्धावर तोडगा निघण्याची शक्यता

युद्ध सुरु झाल्यापासून आम्ही तेथील भारतीयांना मदत करत आहोत. तर त्या देशांच्या प्रमुखांशी वारंवार बोलत आहोत. त्यामुळे यावर लवकरच तोडगा निघेल अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली.

भारतीयांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता

या युद्धात अनेक भारतीय जखमी झाले आहेत तर काही मृत्युमुखी पडले आहेत. जखमी झालेल्या लोकांवर उपचार सुरु आहेत. आम्ही शक्य ती मदत देत आहोत. भारतीयांची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. युद्धाच्या काळात 3 लाख 75 हजार भारतीय मायदेशी परतले आहे. तसेच इराणमधून 1000 लोक मायदेशी परतले असल्याचे मोदी म्हणाले.

भारताकडून 60 टक्के गॅस आयात

भारत आपल्या गरजेचा 60 टक्के गॅस आयात करतो. भारतात मोठ्या प्रमाणात होर्मुझमधून तेलाची आणि गॅसची जहाजे येतात. भारत सरकार आखाती देशांमधून येणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी तत्पर आहे.

अडकलेली अनेक जहाजे सुरक्षित भारतात

आम्ही हार्मुझमध्ये अडकलेली अनेक जहाजे सुरक्षित भारतात आणली आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये इथेनॉलच्या उत्पादनात वाढ झाली आहे, यामुळे इंधन आयातीत थोडी घट झाली आहे. आम्ही LPG चे उत्पादन वाढवले आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर नजर ठेवली जात आहे.

भाषणामधील प्रमुख मुद्दे:

पश्चिम आशियातील परिस्थिती: इराण-इस्त्रायल संघर्षावर चिंता व्यक्त करत, या परिस्थितीचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो.

भारतीयांची सुरक्षा: त्या भागात राहणाऱ्या सुमारे एक कोटी भारतीयांची सुरक्षा ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे.

पेट्रोलियम साठा: भारतात ५३ लाख मेट्रिक टनहून अधिक पेट्रोलियम साठा उपलब्ध असल्याचे सांगितले.

युद्ध थांबवण्याचे आवाहन: युद्धाच्या विरोधात भूमिका मांडत, संवादाद्वारे प्रश्न सोडवण्यावर भर दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts