Nirmala Navale Election Reaction : कारेगावच्या माजी सरपंच आणि सोशल मीडियावर रिलस्टार म्हणून ओळख असलेल्या निर्मला नवले यांचा निवडणुकीत पराभव झाला. या पराभवानंतर त्यांनी भावनिक होत आपली भूमिका मांडली. पुढील काळातही जनतेसाठीचा लढा सुरूच राहील, असा निर्धार नवले यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्यांचे सामाजिक आणि राजकीय काम सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांची दिले आहे. एका पराभवाने खचून न जाता पुन्हा जमतेची कामे कारयाला त्या सक्रिय झाल्या आहेत.
निवडणुकीत पैसा जिंकला, माणूस हरल, असं भावनिक नवले यांनी व्यक्त केलं. त्या पुढे बोलताना असंही म्हणाल्या, माझा लढा इथे थांबणारा नाही. सुमारे ३०० मतांनी झालेला पराभव त्यांनी अनपेक्षित असल्याचे सांगितले. मात्र, तब्बल ६,५७७ मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवला, याबद्दल त्यांनी मतदारांचे मनापासून आभार मानले.
पैशांच्या जोरावर मतं विकत घेता येऊ शकतात, पण निष्ठा नाही
या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांपेक्षा पैसा आणि व्यसनांचीच अधिक चर्चा झाल्याची खंत नवले यांनी व्यक्त केली. “पैशांच्या जोरावर मतं विकत घेता येऊ शकतात, पण निष्ठा नाही, असे परखड मत त्यांनी मांडले. विशेषतः गावातील तरुण पिढी ड्रग्ससारख्या व्यसनांच्या आहारी जात असल्याचे चित्र अत्यंत चिंताजनक असून, हे कोणत्याही निवडणूक विजयापेक्षा अधिक वेदनादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकांसाठी काम करण्याची आपली जिद्द अजूनही कायम
राजकारण कदाचित बिघडलेले असेल, पण लोकांसाठी काम करण्याची आपली जिद्द अजूनही कायम आहे. सामाजिक प्रश्न, विकास आणि तरुणांच्या भवितव्यासाठी आपला संघर्ष पुढेही सुरूच राहील, असा निर्धार निर्मला नवले यांनी व्यक्त केला आहे.












