Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • शिंदे सेनेचा कोळथा हे दिल्लीचे अमित शहा काढणार; संजय राऊंत बाॅम्ब
Top News

शिंदे सेनेचा कोळथा हे दिल्लीचे अमित शहा काढणार; संजय राऊंत बाॅम्ब

Shivsena Leader Sanjay Raut

35 MLAs of Shinde Sena will split : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या प्रचारादरम्यान महायुती सरकारमध्ये एकत्र असलेला शिंदे गट आणि भाजप यांच्यातील वाद उफाळून वर आला आहे. मला 2 दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, असे वक्तव्य खुद्द दस्तूर भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या रविंद्र चव्हाण यांनी केल्याने त्याला सर्वांनी गांभिर्याने घेतले आहे. त्यांच्या वक्तव्याने स्पष्ट केलं की, महायुतीमध्ये काहीच आलबेल नाही. त्यानंतर आता ठाकरे सेनेचे फायरब्रांड नेते संजय राऊत यांनी मोठा बॉम्ब टाकला आहे. शिंदे सेनेचा कोळथा हे दिल्लीचे अमित शहा काढणार असं म्हणत शिंदेचे ३५ आमदार फुटणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. डोंबिवलीचे रहिवासी असलेल्या रविंद्र चव्हाण यांना भाजपने त्याच कारणामुळे प्रदेसाध्यक्ष म्हणून निवडले, असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.

निवडणुका उद्यावर येऊन ठेपल्या आहेत आणि मंत्री म्हणतात 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होईल. निवडणूक आयोगाने याकडे लक्ष दिलं पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार, हे मुळात नगरपालिका किंवा नगरपंचायत निवडणुका लढवतच नाहीत. एकेका निवडणुकीसाठी 10-15 कोटीचं बजेट आहे. 5-6 हेलिकॉप्टर आहेत. ही सत्तेतल्या 3 पक्षांतील स्पर्धा आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर हल्ला चढवला. इतके कोट्यावधी रुपये खर्च करून कोणासाठी लढताय असा सवाल विचारत या राज्याची निवडणूक संस्कृती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, किती पैसे खर्च करावेत याला काही मर्यादाच उरलेली नाही अशीही, ही तिन्ही पक्षातील स्पर्धा आहे, अशी टीका राऊतांनी केली.

हेही वाचा – ऐन वेळेवर निवडणूक कॅन्सल; निवडणूक आयोगावर मुख्यमंत्री यांचे स्पष्ट वक्तव्य

शिंदे सेनेचा कोळथा हे दिल्लीचे अमित शहा काढणार हे लिहून घ्या..

शिंदे शिवसेना वि. भाजप अशी स्पर्धा निवडणुकीत दिसत आहे का असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला. मुळात शिंदे यांची शिवसेना असं म्हणायला आम्ही तयार नाही. आणि शिंदे सेनेचा कोळथा हे दिल्लीचे अमित शहा काढणार हे लिहून घ्या. त्यांनी आमचा कोथळा काढायचा प्रयत्न केला होता पण आम्ही बाहेर पडलो. पण त्यांच्या स्वभावानुसार, कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढला जाईल. शिंदेचे 35 आमदार फुटणार. ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेनेबाबत केलं, त्याच पद्धतीने शिंदे यांचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांची नेमणूक त्यासाठीच केलीआहे. हे राजकारण समजून घेतलं पाहिजे.

शिंदे यांचा पक्ष आधीच फुटलेला आहे – संजय राऊत

यांना (शिंदे) वाटत असेल की दिल्लीचे 2 नेते आमच्या पाठीशी आहेत, पण ते कोणाचेच नाहीत, कोणाच्याच पाठिशी नाहीत. त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसताना मागेपुढे पाहीलं नाही, तर मग हे शिंदे कोण ? शिंदे तर त्यांनीच पाळलेले आहे. शिंदे यांचा पक्ष आधीच फुटलेला आहे. हा अमित शहा यांनी निर्माण केलेला गट आहे, हा अमित शहांचा पक्ष आहे, शिंदेंचा पक्ष नाही. यांनी (शिंदे) कधी शिवसेने साठी खस्ता खाल्ल्यात? हे कधी शिवसेनेसाठू तुरूंगात गेले ? कधी आंदोलनं केली? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. पैशाच्या ताकदीवर निवडणुका जिंकणं म्हणजेच लोकशाही नाही अशी घणाघाती टीका राऊत यांनी केली. फडणवीस यांचं राजकारण शिंदे यांना कळतं नसेल तर त्यांनी करू नये. फक्त पैशावर राजकारण चालत नाही. पैशावर लोक विकत घेता येतात असंही ते म्हणाले.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts