Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • आजोबांपेक्षा नातू वरचढ! पार्थ पवारांची पेक्षा शरद पवारांपेक्षा अफाट पैसा, प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर
Top News

आजोबांपेक्षा नातू वरचढ! पार्थ पवारांची पेक्षा शरद पवारांपेक्षा अफाट पैसा, प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर

Parth Pawar's wealth

Parth Pawar wealth : महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबाचे नाव नेहमीच चर्चेत असते. मात्र, सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांचे नातू पार्थ पवार यांच्या संपत्तीची. मार्च २०२६ च्या राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार पार्थ पवार हे त्यांचे आजोबा शरद पवार यांना वरचढ ठरले आहेत. कारण शरद पवार यांच्यापेक्षाही पार्थ पवार यांच्याकडे अफाट पैसा असल्याचे या प्रतिज्ञापत्रातून समोर आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांनी राज्यसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली एकूण संपत्ती ८७ कोटी रुपये असल्याचे घोषित केले आहे.  विशेष म्हणजे, महाराष्ट्रातून राज्यसभेच्या रिंगणात असलेल्या प्रमुख सात उमेदवारांपैकी पार्थ पवार हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.

हेही वाचा – धर्मांतरविरोधी कायद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, लवकरच दोन्ही सभागृहात मंजूरीसाठी मांडले जाणार

गेल्या सात वर्षांत त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जेव्हा पार्थ यांनी मावळ मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांची संपत्ती सुमारे २० कोटी रुपये होती. गेल्या सात वर्षांत त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली असून, ती आता ८७ कोटींवर पोहोचली आहे. शरद पवारांनी आता दाखल केलेल्या शपथपत्रात आपली मालमत्ता 60.71 कोटी असल्यांचं जाहीर केलंय, शरद पवार यांनी २०२० मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती सुमारे ३२.७३ कोटी रुपये इतकी होती. यामध्ये सुमारे १० कोटींची जंगम आणि २२ कोटींची स्थावर मालमत्ता होती. या आकडेवारीनुसार, आजोबांच्या तुलनेत नातवाची संपत्ती दुपटीहून अधिक आहे.

कौटुंबिक नात्यात आर्थिक देवाणघेवाण

पार्थ पवारांनी २०१९ मध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी त्यांचे आजोबा शरद पवार यांना ५० लाख रुपये आणि आत्या सुप्रिया सुळे यांना २० लाख रुपये अ‍ॅडव्हान्स म्हणून दिले होते. कौटुंबिक नात्यात आर्थिक देवाणघेवाण असली, तरी वैयक्तिक मालकीच्या बाबतीत पार्थ पवारांचे पारडे जड दिसत आहे. पार्थ पवार यांच्या ८७ कोटींच्या मालमत्तेमध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे, त्यांच्या विविध बँकांमध्ये २.११ कोटी रुपये असून, २.५ कोटी रुपयांचे शेअर्स आणि बाँड्स आहेत. पार्थ यांनी इतरांना २ कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. त्यांच्यावर स्वतःवर सुमारे ९२ लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यांच्याकडे पुण्याच्या कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरात मोक्याच्या जमिनी आहेत. त्यांच्याकडे स्वतःचा १३ कोटींहून अधिक किमतीचा बंगला देखील आहे. त्यांच्याकडे ट्रॅक्टर, मोटारसायकल आणि ट्रेलर यांसारखी वाहने आहेत.

अजित पवार यांची संपत्ती देखील लक्षणीय

पार्थ यांचे वडील अजित पवार यांची संपत्ती देखील लक्षणीय होती. त्यांच्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांची एकूण संपत्ती ४५.३७ कोटी रुपये इतकी होती. काही अहवालांनुसार त्यांच्या कुटुंबाची एकत्रित संपत्ती १२४ कोटींच्या घरात असल्याचेही म्हटले जाते. पार्थ पवार यांनी लंडनमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१९ मध्ये राजकारणात प्रवेश केला. मावळ लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असला, तरी आता राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांची व्यावसायिक गुंतवणूक आणि रिअल इस्टेटमधील रस यामुळे त्यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

पार्थ पवारांच्या या प्रतिज्ञापत्रातून आर्थिक ताकद सिद्ध

पवार कुटुंबातील नव्या पिढीकडे केवळ राजकीय वारसाच नाही, तर मोठी आर्थिक ताकदही असल्याचे पार्थ पवारांच्या या प्रतिज्ञापत्रातून सिद्ध झाले आहे. शरद पवारांसारख्या अनुभवी नेत्याच्या तुलनेत तरुण पार्थ पवारांची वाढलेली ही श्रीमंती सध्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा मोठा विषय ठरली आहे.

राजकीय वजन मिळवण्यात पार्थ पवार भविष्यत यशस्वी ठरणार?

संपतीच्या बाबतीत जरी पार्थ पवार आपल्या आजोबांना वरचढ ठरले असले तरी राजकीय वजन हे शरद पवारांचं सर्वांनाच माहीत आहे, त्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी केवळ पैसा नाही, तर शरद पवारांसारख राजकीय वजन मिळवण्यात पार्थ पवार भविष्यत यशस्वी ठरणार का? हे तर येणारा काळच सांगेल, मात्र सध्या अजित पवार गेल्यानंतर पार्थ पवारांच्यावर पहिल्यांदा मोठी जबाबदारी आली, दिल्लीत त्यांना पाठवण्यात आलं, अजितदादांनाही 1991 ला असंच दिल्लीत पाठवण्यात आलं होतं, त्यानंतर दादांनी राजकारणात कधी मागे वळून पाहिलं नाही, त्यामुळे पार्थ पवारांची राजकीय कारकीर्दही आता पाहण्यासारखी राहणार आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts