PM Narendra Modi On Asha Bhosle Hospitalisation | प्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांना शनिवारी (11 एप्रिल) हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आल आहे. सध्या त्यांना आत्पकालीन वैद्यकीय सेवा विभागात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांनी, कलाकारांनी आणि चाहत्यांनी आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत त्यांची प्रकृती ठीक होण्यासाठी प्रार्थना केली आहे.
हेही वाचा – इराण–अमेरिकेतील चर्चा अयशस्वी; तणाव पुन्हा टोकाला, युद्ध पेटणार?
आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
आता पंतप्रधना नरेंद्र मोदी यांनी आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “आशा भोसले यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे एकूण मी अत्यंत चिंतेत आहे. त्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी मी प्रार्थना करत आहे”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
Deeply concerned to hear that Asha Bhosle Ji has been admitted to hospital. Praying for her good health and a speedy recovery.
— Narendra Modi (@narendramodi) April 12, 2026
आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आशा भोसले यांनी नात जनाई भोसलेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये जनाई भोसलेने म्हटलं आहे की, माझी आजी आशा भोसले यांना छातीत संसर्ग झाल्यामुळे आणि थकवा जाणवत असल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. कृपया सर्वांनी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा ही नम्र विनंती. तसेच लवकरच सर्व काही ठीक होईल अशी आशा आहे. लवकरच आम्ही सकारात्मक अपडेट देऊ, असं जनाईने पोस्ट करत म्हटलं आहे.
आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समजताच संपूर्ण बॉलिवूड सिनेसृष्टीत आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे आणि नाराजीचे वातावरण आहे. आशा भोसले यांची प्रकृती बरी होण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावरून प्रार्थना केली आहे.












