Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • बीड शहरात सत्ता परिवर्तन! नगरपरिषद क्षिरसागर मुक्त अन् नागरीक त्रस्त 
Top News

बीड शहरात सत्ता परिवर्तन! नगरपरिषद क्षिरसागर मुक्त अन् नागरीक त्रस्त 

Beed Municipal Council

Beed Municipal Council : बीड नगरपरिषद क्षिरसागर मुक्त करून नगरपरिषदेमध्ये सत्ता परिवर्तन झाले बीड शहरातील समस्या सोडवण्यासाठी दिवंगत अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शना खाली या नगरपरिषदेची निवडणूक पार पडली आणि अजित पवार गटाला यशही मिळाले. मात्र, बीड शहरात गेल्या 40 वर्षापासून कचरा आणि पाण्याची समस्या आजही कायम असल्याने नागरिकांना याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. विशेष करून कचऱ्यासाठी मात्र नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

हेही वाचा – RRB मधील ग्रुप-डी पदासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ, 22 हजार जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळणार

जिल्हा नियोजन समितीकडून 35 घंटागाड्या, 2 जेसीबी 2 टिप्पर ची खरेदी केले आहेत. या घंटागाड्याच्या माध्यमातून बीड शहरातील कचरा एकत्रित केला जातो. प्रत्येक प्रभागाला एक घंटागाडी उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक दोन दिवसाला घंटागाडी त्या प्रभागात फिरते शहरातील नागरिकांनी फक्त घंटागाडी मध्येच कचरा टाकावा. काही व्यापारी व नागरिक त्यांच्या सोयीनुसार कचरा टाकत आहेत. नगरपालिकेकडे जे मनुष्यबळ आहे ते कमी प्रमाणात आहे. आहे ते मनुष्यबळ कचरा उचलण्यासाठी वापरावे लागत आहे. त्याचा परिणाम नाली काढण्यासाठी मनुष्यबळ मिळत नाही. ज्या भागात गाडी येत नाही, त्या ठिकाणच्या नागरिकांनी आम्हाला संपर्क साधावा. नागरिकांनी मोकळ्या जागेत कचरा टाकू नये अंकुश नगर भागात काही ठिकाणी कचरा टाकला जातो. त्याचबरोबर खंडेश्वरी कडे देखील मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. वाहन चालकाला सक्त सूचना दिल्या आहेत की, ज्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आहे त्या ठिकाणी कचरा डम्पिंग करावा अन्यथा तुमच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी शैलेश फडशे यांनी दिलीय.

पिण्याच्या पाण्याच्या समस्या कायम

माजलगाव धरणातून जे अपेक्षित पाणी  बीड शहराला हवे आहे, ते मिळत नाही. त्यासाठी जो विद्युत भार आपल्याकडे उपलब्ध नाही. बीड नगरपालिकेकडे 52 कोटीची विद्युत विभागाची थकबाकी आपल्याला तीस ते पस्तीस एम एल डी पाणी दोन्ही धरणाकडून आपण घेतो. उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करून बीड शहराला नगरपरिषदेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे बीड शहरातील नागरिकांना आव्हान आहे की आपण पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन फडसे यांनी केले आहे.

स्वच्छता विभागाचा कोनाडोळा

रस्त्यावर कचरा टाकू नका घंटागाडी आल्यानंतरच आपला कचरा घंटागाडी टाकावा. रस्त्यावर कचरा टाकू नये सर तुमच्याकडे घंटागाडी येत नसेल तर स्वच्छता विभागाकडे तक्रार करा रस्त्यावर कचरा टाकू नका जेवढी जिम्मेदारी नगरपरिषदेची आहे तेवढीच त्या प्रभागात राहाणाऱ्या नागरिकांची आहे. त्याचबरोबर त्या प्रभागात असलेले नगरसेवकाची देखील जिम्मेदारी आहे की त्यांनी रस्त्यावर कचरा टाकु नका असे आव्हान करावे. जेवढी नगरपरिषदेची जबाबदारी आहे तेवढीच नागरिकांनी देखील ही जबाबदारी घेतली पाहिजे.

नागरीकांच्या आरोग्याची जिम्मेदारी कोणाची?

बीड शहरात बऱ्याच वर्षापासून कचऱ्याचे अनेक भागात ढीग पडलेले होते. अजित दादांनी आम्हाला सांगितले होते की, बीड शहर स्वच्छ दिसले पाहिजे. आमदार विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम आम्ही चालू केली आहे. आम्ही जेवढा कचरा उचलत आहोत तेवढाच कचरा पुन्हा त्या ठिकाणी येऊन पडत आहे. फक्त नगर परिषदेची जिम्मेदारी नसून नागरिकांची देखील जिम्मेदारी आहे. सर्व नागरिकांनी रस्त्याच्या कडेला कचरा टाकला तर आम्ही दंडात्मक कार्यवाही करू. जेवढा कचरा मागील दहा वर्षात नव्हता तेवढा कचरा या दीड ते दोन महिन्यात जमा झाला आहे. जी यंत्रणा नगरपरिषेकडे उपलब्ध आहे, त्याच्या माध्यमातूनच आम्ही स्वच्छता मोहीम करत आहोत, अशी माहिती बीड नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांनी दिलीय.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts