Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • Top News
  • झटपट होणारा ओट्सचा ‘हा’ नाश्ता कधी ट्राय केलाय का? लगेच लिहून घ्या रेसिपी
Top News

झटपट होणारा ओट्सचा ‘हा’ नाश्ता कधी ट्राय केलाय का? लगेच लिहून घ्या रेसिपी

oats

Quick Oats Breakfast Recipe: आजच्या धावपळीच्या जीवनात झटपट आणि पौष्टिक नाश्ता गरजेचा आहे. रोजच्या त्याच मेन्यूला कंटाळा आला असेल, तर ओट्सपासून बनणारा हा सोपा आणि हेल्दी पर्याय नक्की ट्राय करा.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सकाळचा नाश्ता पौष्टिक आणि झटपट तयार होणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र, रोज तेच ते खाऊन कंटाळा येणंही साहजिकच आहे. अशा वेळी काहीतरी हेल्दी, चविष्ट आणि पटकन तयार होणारं पर्याय मिळालं तर किती छान होईल, नाही का? म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ओट्सपासून बनवणारा एक खास आणि सोपा नाश्ता, जो तुमच्या दिवसाची सुरुवात ऊर्जा आणि ताजेपणाने करेल.

साहित्य

कप ओट्स
1/2 कप बारीक चिरलेला कांदा
1/2 कप मिक्स भाज्या (गाजर, मटार, शेंग)
1 हिरवी मिरची (चिरलेली)
1/2 चमचा मोहरी
1/2 चमचा जिरे
6-7 कढीपत्त्याची पानं
1 चमचा तेल
चवीनुसार मीठ
1/2 चमचा लिंबाचा रस
कोथिंबीर सजावटीसाठी

कृती

सर्वप्रथम कढईत ओट्स हलके भाजून घ्या आणि बाजूला ठेवा.

त्याच कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे आणि कढीपत्ता टाका.

त्यात हिरवी मिरची आणि कांदा घालून गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.

आता मिक्स भाज्या घालून 2-3 मिनिटं शिजू द्या.

त्यात भाजलेले ओट्स आणि थोडंसं पाणी घाला.

मीठ घालून चांगलं मिक्स करा आणि झाकण ठेवून 2-3 मिनिटं शिजवा.

शेवटी लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts