Satyacha Morcha : आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. मतचोरी होते, दुबार मतदार आहेत, एकाच पत्त्यावर अनेक नावे आहेत, त्यामुळे मतदार याद्या दुरूस्त कराव्यात, अशी मागणी विरोधकांकडून केली आहे. मात्र निवडणूक आयोग विरोधकांना याचा पुरावा द्या असं सांगत आहे. त्यावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी दुबार मतदार पुराव्याचा ढिगारा दाखवत राष्ट्रीय निवडणूक आयोगावर हल्लाबोल चढवला.
शरद पवार, कम्युनिस्ट पक्ष, उद्धव ठाकरे मी सर्व बोलतोय इतकेच नाही तर भाजपाच्या नेत्यांसह शिंदे, अजित पवारही दुबार मतदाराबाबत बोलत आहेत, तरी मतदार याद्या साफ होत नाहीत. मतदार याद्या साफ करण्यास आणि दुरूस्त करण्यास कोणी अडवलंय, असं म्हणत राज ठाकरे सत्याचा मोर्चामध्ये पुराव्याच्या ढिगारा दाखवला.
ठाणे मतदारसंघात २ लाख ९ हजार ८१ दुबार मतदार
कल्याण-डोंबिवली यासह या भागातील साडेचार हजार लोकांनी मलबार हिल मतदारसंघात मतदान केले. त्यांनी तिथेही मतदान केले आणि इथेही मतदान केले. राज्यभरात लाखो मतदार असे आहेत, जे अशा प्रकारे मतदार आहेत आणि त्यांनी दुबार मतदान केलंय. ठाणे मतदारसंघात २ लाख ९ हजार ८१ दुबार मतदार असल्याचं सांगत राज ठाकरेंनी याचा पुरावा दाखवला. २०१७ पासून आपण याबाबत बोलत असल्याचंही राज म्हणाले.
हे ही वाचा – Satyacha Morcha : मतांचा अधिकार टिकवायचा असेल तर, तुम्हाला मला एक यावचं लागेल; शरद पवार
भाजपचे लोकही बोलत आहेत दुबार मतदार आहेत
“आजचा मोर्चा हा दिल्लीपर्यंत समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे. या विषयात सर्वांनीच भाष्य केलं आहे. बोललेले आहेत. तोच विषय नव्याने सांगण्यासारखा असं काहीच नाही. मी सर्वांचे आभार मानतो. तुम्ही ताकदीने मोर्चाला जमला. हा खुप छोटा विषय आहे, मोठा विषय नाहीये. दुबार मतदार असल्याचे आम्ही बोलत आहोत सत्ताधाऱ्यांमधले सर्व बोलत, मग या याद्या दुरूस्त करायला काय हरकत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
दुबार मतदार असल्याचे मी बोलत आहे
राज ठाकरेंनी मुंबईतील दुबार मतदार मतदारांची यादी वाचून दाखवली. ४ हजार ५ हजार मतदारानी मलबार हिल येथे दुबार मतदान केले. मतदार याद्या स्वच्छ केल्यावरच निवडणुका घ्या. आजचा मोर्चा राग व्यक्त करण्याचा, ताकद दाखवणारा मोर्चा. दुबार मतदार असल्याचं भाजप, शिंदेंचेही लोक म्हणत असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितलं.








