Rashmika Mandanna Pregnant | अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अभिनेता विजय देवराकोंडा (Vijay Deverakonda) यांच्या लग्नाला एक महिना उलटून गेला आहे. रश्मिका आणि विजयने 26 फेब्रुवारी रोजी उदयपूरमधील आयटीसी मेमेंटोज हॉटेलमध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. रश्मिका आणि विजय यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पारंपरिक तेलगू पद्धतीने लग्न केले. त्यानंतर कोडवा पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा पार पडला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. अशातच आता रश्मिका आणि विजय पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
हेही वाचा – महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार? सुनेत्रा पवारांसाठी धोक्याची घंटा, 15-20 आमदार शरद पवारांच्या संपर्कात?
रश्मिकाने नेमकी काय शेअर केली पोस्ट?
नुकतीच रश्मिकाने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे ती गरोदर असल्याची चर्चा सुरू झाली आहे. रश्मिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे आणि तिच्या प्रेग्नंसीबाबत चर्चा सुरू झाली आहे.
View this post on Instagram
कशा सुरू झाल्या रश्मिकाच्या प्रेग्नंसीच्या चर्चा?
रश्मिकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रश्मिका आणि विजय यांच्यासोबत एक पिवळ्या फुलाचे चित्र त्यांच्याभोवती फिरताना दिसत आहे. तर हा व्हिडीओ शेअर करत रश्मिकाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आता आम्ही तिघे झालो आहोत.” रश्मिकाने ही पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेक चाहत्यांनी रश्मिका गरोदर आहे का? असे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. तर अनेकांनी रश्मिका आणि विजयचे अभिनंदन केले आहे. तर रश्मिकाच्या गरोदरपणाच्या या चर्चांवर अद्याप रश्मिका आणि विजयने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.
दम्यान,रश्मिका आणि विजय एकमेकांना बऱ्याच काळापासून डेट करत होते. तर यावर्षी 26 फेब्रुवारी रोजी ते दोघे विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर, रश्मिका-विजयने हैदराबादमध्ये त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील मित्रांसाठी एका भव्य रिसेप्शनचे आयोजन केले होते ज्यात राम चरण, अल्लू अर्जुन आणि नागार्जुन यांच्यासह अनेक बड्या सेलेब्रिटींनी हजेरी लावली होती.












