Nashik Ashok Kharat Case | नाशिकमधील (Nashik) ज्योतिषी अशोक खरातचा (Ashok Kharat) खरा चेहरा समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी अशोक खरातला एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तर पोलिसांनी खरातच्या फार्महाऊसवर छापा टाकल्यानंतर त्यांना 58 आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले आहेत ज्यामुळे सर्वांना धक्का बसला. तर या प्रकरणात आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणर (Rupali Chakankar) यांचं नाव घेतलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी या प्रकरणावरून रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तर आता या प्रकरणी रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा – अशोक खरात प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; फार्महाऊसवर शस्त्र अन् SIT ची मोठी कारवाई
रूपाली ठोंबरे पाटील यांनी नेमकी काय पोस्ट केली?
अशोक खरात प्रकरणावरून रूपाली ठोंबरे पाटील यांनी रूपाली चाकणकरांवर गंभीर आरोप केले आहेत. अशोक खरात प्रकरणातील सर्व पुरावे चाकणकर नष्ट करतील, असा थेट आरोप रूपाली ठोंबरेंनी केला आहे. तसेच आता चाकणकरांबाबत रूपाली ठोंबरेंनी फेसबुकवर एक खळबळजनक पोस्ट केली आहे.
रूपाली ठोंबरेंची फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. त्यांनी फेसबूकवर एक पोस्ट लिहिली आहे, ज्यात “राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर फरार…बजाव टाली” असं लिहिलं आहे. ठोंबरेंनी केलेल्या या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
https://www.facebook.com/100044602476673/posts/1467769244719811/?mibextid=rS40aB7S9Ucbxw6v
तसेच काल पुण्यात पत्रकार परिषद घेत रूपाली ठोंबरेंनी रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला होता. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्याशिवाय खरात प्रकरणाचा तपास पूर्ण होणार नाही. हा विषय कोणत्या जातीचा किंवा पक्षाचा नसून महिलांचा आहे. अशोक खरात प्रकरणाची वाचा 1 वर्षांपूर्वी फोडली होती. पण महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या ट्रस्टवर आहेत, त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली नव्हती का? खरातच्या पेनड्राईव्हमध्ये 58 व्हिडीओ सापडलेत, म्हणजे 58 महिलांवर अत्याचार झाला आहे का? असा सवाल रूपाली ठोंबरेंनी उपस्थित केला.
रूपाली चाकणकरांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी जर राजीनामा दिला नाही तर आम्ही पूर्ण राज्यात आंदोलन करू, असा थेट इशारा देखील रूपाली ठोंबरे पाटील यांनी दिला आहे.












